छोट्या पडद्याची क्वीन दिव्यांका त्रिपाठी बनणार 'खतरों के खिलाडी'

छोट्या पडद्याची क्वीन दिव्यांका त्रिपाठी बनणार 'खतरों के खिलाडी'

इशिता भल्ला म्हणजेच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ने नुकतच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलखातीत आपल्याला खतरोंके खिलाडी कार्यक्रमात भाग घ्यायला आवडेल असं म्हटलं होतं. त्यानंतर आता तिच नाव निश्चित झालं आहे.

  • Share this:

मुंबई 23 एप्रिल: छोट्या पडद्याची क्वीन समजली जाणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi Dahiya) आता एक वेगळ्या रुपात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. रोहीत शेट्टी  (Rohit Shetty) चा खतरों के खिलाडी हा लोकप्रिय कार्यक्रमात ती दिसणार आहे. ‘फियर फॅक्टर – खतरोंके खिलाडी’ चं हे 11 (Fear factor: khatron ke Khiladi 11) व पर्व आहे. ‘ये है मौहबत्ते’ (Yeh hai mohabattein)  मधील इशिता भल्ला म्हणजेच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ने नुकतच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलखातीत आपल्याला खतरोंके खिलाडी कार्यक्रमात भाग घ्यायला आवडेल असं म्हटलं होतं. दिव्यांकाला पोहोण्याची भिती होती त्यामुळे पूर्वी ती या कार्यक्रमात भाग घेऊ शकली नव्हती पण आता ती या भितीतून बाहेर आल्याचं समजत आहे. आणि ही गोष्ट रोहीत शेट्टीला समजल्यानंतर त्याने दिव्यांकाशी शो बद्दल बोलणी सुरू केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने (TOI) दिलं होत.

दिव्यांकाच नाव आता या शो साठी कन्फर्म झालं आहे. दिव्यांका याधीही काही रियॅलिटी शो मध्ये दिसली होती. ‘नचले वे विथ सरोज खान’, ‘जोर का झटका – टोटल वाइप आउट’, ‘कॉमेडी सर्कस आणि नचबलिए 8’. पण दिव्यांका पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर स्टंट करताना दिसणार आहे. दिव्यांका ही हिंदी टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री असून तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे दिव्यांकाला या शोमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते फारच उत्सुक आहेत.

शाहरूख खानच्या बायको-मुलाचा VIDEO पाहून भडकले नेटिझन्स; गौरी-आर्यन होतायेत ट्रोल

दिव्यांका व्यतिरिक्त टिव्ही चे अन्य स्टार्स देखिल या पर्वात पहायला मिळणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या व़त्तानुसार नागिन फेम अभिनेता अर्जून बिजलानी (Arjun Bijlani) , आणि सौरभ जैन (Saurabh Jain) हे देखिल या शओ मध्ये दिसणार आहेत.

या पर्वाचं शुट हे केप टाउन (Cape town), साउथ अफ्रिकेत होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सगळे सेलिब्रिटी स्पर्धक 6 मेला केप टाउनसाठी फ्लाइट घेणार आहेत. याआधी हे शूट अबू धाबीत होणार होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय बदलण्यात आला. तर अद्याप या कार्यक्रामाची तारीख समोर आली नाही.

Published by: News Digital
First published: April 23, 2021, 9:48 AM IST

ताज्या बातम्या