बिग बींनी चक्क या अभिनेत्रीची ओढणी पकडली! असं पकडून नेलं आणि... पाहा VIDEO

बिग बींनी चक्क या अभिनेत्रीची ओढणी पकडली! असं पकडून नेलं आणि...  पाहा VIDEO

दिव्यांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जानेवारी : छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी Instagram वरच्या एका व्हिडीओवरून चर्चेत आली आहे. दिव्यांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत एक VIDEO शेअर केला आहे. आणि हा व्हिडिओही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओत चक्क बिग बी अमिताभ बच्चन दिव्यांकाचा दुपट्टा पकडून तिला घेऊन जाताना दिसत आहेत.

साक्षात बिग बींनी अशी ओढणी पकडून नेताना दिव्यांकाच्या चेहऱ्यावरही अस्वस्थता दिसून येत आहे. आता हा व्हिडिओ दिव्यांकाने इन्स्टाग्रामवर अपलोड करून चाहत्यांकडे कॅप्शनची मागणी केली आहे. #LegendOfBigScreen असा हॅशटॅगही या व्हिडीओला दिव्याकांने दिला आहे. याला काय ओळी लिहाव्यात, असं तिने चाहत्यांनाच विचारलं आहे. दिव्यांकाचा हा क्युट व्हिडीओ चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करताच एका तासात 1,37,000 हून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. दिव्यांका सध्या अमिताभ बच्चनसोबत काम करत आहे. या प्रोजेक्टवरून दिव्यांका खूप आनंदी असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. एखाद्या जाहिरातीच्या चित्रीकरणाचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातं आहे. परंतु, अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

बिग बी आगामी काळात चार चित्रपटांत झळकणार असल्याचं सांगितलं जातं आहे. यामध्ये चेहरे, ब्रह्मास्त्र, झुंड आणि गुलाबो सिताबो यांचा समावेश आहे. ‘चेहरे’ चित्रपटात अमिताभ बच्चन इम्रान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘ब्रह्मास्त्र’मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत दिसणार आहेत.

अन्य बातम्या

PHOTOS : नेहा-आदित्यची बॅचलर पार्टी, इंडियन आयडलच्या सेटवर लगीनघाईपाहा

VIDEO : Love Aaj Kal मधील गाण्याची कॉपी उघड? iPhone कनेक्शन आलं समोर

 

First published: January 31, 2020, 10:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading