Home /News /entertainment /

दिशा परमार-राहुल वैद्य बनणार आईबाबा? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

दिशा परमार-राहुल वैद्य बनणार आईबाबा? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

दिशा परमार (Disha Parmar) आणि राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या घरात लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

    मुंबई, 19 फेब्रुवारी-   दिशा परमार   (Disha Parmar)   आणि राहुल वैद्य   (Rahul Vaidya)  यांच्या घरात लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नुकतंच डिनर डेटनंतर राहुल आणि दिशा कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की दिशा प्रेग्नंट आहे का? आता सोशल मीडियावर या प्रश्नांचा वर्षाव होत आहे. आता स्वतः दिशा परमारनेच या प्रकरणावर मौन सोडले आहे. आणि या बातमीचे सत्य समोर आणले आहे. दिशा परमार आणि राहुल वैद्य 17 फेब्रुवारीला डिनर डेटवर पोहोचले होते. येथे दोघांनीही पापाराझींना पोझ दिली. जेव्हा हे फोटो व्हायरल झाले तेव्हा लोक दिशाच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावू लागले. वास्तविक, दिशाच्या ड्रेसबद्दल ही अटकळ बांधली जात होती. कारण यादरम्यान दिशाने ओव्हरसाईज ऑरेंज शर्ट आणि जीन्स घातली होती आणि राहुल ब्लॅक टी-शर्टसह डेनिममध्ये हँडसम दिसत होता. दिशाच्या ओव्हरसाईज शर्टमुळे लोकांना वाटू लागले की तिने बेबी बम्प लपवण्यासाठी सैल कपडे घातले आहेत. प्रेग्नेन्सीबाबत सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाल्यानंतर दिशा परमारनेच या प्रकरणावरुन पडदा हटवला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत अभिनेत्रीच सत्य सांगितले आहे. तिने इन्स्टा स्टोरीवर लिहिले- 'मी पुन्हा कधीही ओव्हरसाईज्ड शर्ट किंवा ड्रेस घालणार नाही. कॉल करणाऱ्यांसाठी आणि जाणून घेण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी... मी गरोदर नाही'. दिशा परमारने गेल्या वर्षी 16 जुलै रोजी राहुल वैद्यसोबत लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली होती. बिग बॉस 14 च्या घरातून राहुलने दिशाला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज करून आपले प्रेम व्यक्त केले होते. सध्या दिशा टीव्ही शो 'बडे अच्छे लगते हैं 2' मध्ये अभिनेता नकुल मेहतासोबत प्रियाच्या भूमिकेत दिसत आहे. राहुल आणि दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण चाहत्यांशी शेअर करत असतात.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या