• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Ex Boyfriendचं नाव निघताच Devoleena Bhattacharjee ला कोसळलं रडू ; Video होतोय व्हायरल

Ex Boyfriendचं नाव निघताच Devoleena Bhattacharjee ला कोसळलं रडू ; Video होतोय व्हायरल

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) फ्लिपकार्टचा शो लेडीज वर्सेज जेंटलमॅन सीजन 2 मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये देवोलीनाच्या एक्स बॉयफ्रेंडच नावं काढताच ती काहीशी भावूक झाली.

 • Share this:
  मुंबई 2 नोव्हेंबर :  टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) फ्लिपकार्टचा शो लेडीज वर्सेज जेंटलमॅन सीजन 2 मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये देवोलीनाच्या एक्स बॉयफ्रेंडच नावं काढताच ती काहीशी भावूक झाली. सध्या देवोलीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देवोलीना रडताना पाहून पॅनेलमधील जॅस्मिन भसीन तिला आधारा देताना दिसली. अभिनेता रितेश देशमुख हा शो होस्ट करत असतो. यावेळी रितेश देशमुख प्रश्न विचारतो की, रिलेशनशिपमध्ये असताना किती लोकांना वाटतं की महिलांपेक्षा पुरूष गद्दारी करतात. यावर देवोलीना आणि जॅस्मिनने 50 टक्के पुरूष असं करतात असं म्हटलं आहे. तर त्यांच्या विरोधी टीममध्ये असलेले जय भानुशाली आणि टेरंस लुइस यांनी 60 टक्के असं उत्तर दिले. वाचा : Bigg Boss Marathi: टास्कसाठी मीनल-गायत्री आल्या एकत्र! तर दोन्ही टीममध्ये दिसलं देवोलीना यावर म्हणते की, हा प्रश्न माझ्यासाठी चुकीचा आहे. कारण मला वाटतं की, एक तर मुलं सुरुवातीला कमिटमेंट देत नाहीत. चुकूनही दिली तर मग आता जीव कसा वाचवायचा याचाच ते विचार करतात. मग टेरेन्स देवोलीनाला विचारतो की, तिला असा अनुभव कधी आला आहे का. ज्याला उत्तर देताना देवोलिना भावूक होते.ती म्हणते- होय, मी जवळपास 6-7वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. हे सांगताच देवोलीनाला रडू आले. ती रडत म्हणाली, नाही, नाही, मला याबद्दल काही बोलायचे नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते देवोलीना भट्टाचार्जीला मजबूत राहण्याचा सल्ला देत आहेत. देवोलीनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती रिलेशनशिपमध्ये आहे. ती कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे याचा खुलासा तिन आजपर्यंत केलेला नाही. यासोबतच देवोलिनाने यावेळी असं देखील सांगितलं की, येणाऱ्या वर्षात मी लग्न करण्याचा विचार करत आहे. वाचा: 'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्रा आणि दिपूने घेतली राज ठाकरेंची भेट देवोलीनाला कलाविश्वात पदार्पण करुन जवळपास 9  वर्षापेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. ‘साथ निभाना साथिया’, ‘बिग बॉस 13’ या कार्यक्रमातून ती विशेष नावारुपाला आली.
  Published by:News18 Trending Desk
  First published: