Home /News /entertainment /

Debina Bonnerjee ला प्रेग्नेन्सीत जंक फूड खाण्याचे डोहाळे, तब्येत बिघडताच घेतला मोठा निर्णय

Debina Bonnerjee ला प्रेग्नेन्सीत जंक फूड खाण्याचे डोहाळे, तब्येत बिघडताच घेतला मोठा निर्णय

देबिनाने आपल्या प्रेग्नेन्सीतील अनुभव यूट्यूब व्हिडिओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

    मुंबई,19 फेब्रुवारी- देबिना बॅनर्जी   (Debina Bonnerjee)  आणि गुरमीत चौधरी  (Gurmeet Choudhary) लग्नाच्या तब्बल 11 वर्षानंतर आईबाबा होणार आहेत. जेव्हा या जोडप्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आणि चाहत्यांना गुड न्यूज दिली तेव्हापासून चाहते फारच उत्साहित झाले आहेत. या जोडप्याचे मित्र आणि चाहते त्यांना शुभेच्छा देऊ लागले आहेत. आता देबिनाने आपल्या प्रेग्नेन्सीतील अनुभव यूट्यूब व्हिडिओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. आपल्या या युट्यूब व्हिडिओमध्ये ती प्रेग्नेन्सीमधील समस्यांबद्दल बोलत आहे. देबिनालाही प्रेग्नेन्सीत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्याची इच्छा होत आहे. तिने काही दिवस जंक फूडचा मनापासून आस्वाद घेतला. दरम्यान तिला पोटाशी संबंधित समस्या जसे की ऍसिडिटी, जळजळ, गॅस यांसारख्या समस्यांनी ग्रासले आहे. शिवाय देबिनाचे वजन वाढले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री सांगत आहे की तिने या समस्यांपासून कशी सुटका मिळवली. देबिनाने खास डाएट चार्ट फॉलो करून आपली बिघडलेली तब्येत बरी केली आहे. व्हिडिओमध्ये ती ते खाद्यपदार्थ दाखवत आहे, जे खाल्ल्याने तिच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला. आणि तिची तब्ब्येत बिघडली. व्हिडिओमध्ये देबिना वडा पावसोबत हिरवी मिरची खाताना दिसत आहे. शिवाय ती मिरची भजीसुद्द्धा खात आहे. ती गुरमीतलाही खायला सांगते. पण तो या गोष्टी खाणे टाळतो. कारण त्याला वजन वाढण्याची भीती वाटते. देबिना आणि गुरमीतने 2011 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 2008 मध्ये 'रामायण' या मालिकेत काम करत असताना दोघांमधील जवळीकता वाढली होती. या मालिकेत गुरमीतने रामाची भूमिका साकारली होती, तर देबिना सीतेच्या भूमिकेत दिसली होती. दोघेही छोट्यापडद्यावरील रोमँटिक कपल म्हणून ओळखले जातात. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या दैनंदिन अपडेट्स जाणून घ्यायला फार आवडतं.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Health Tips, Pregnancy, Tv actress

    पुढील बातम्या