Home /News /entertainment /

Instagram Trend चं एवढं वेड की प्रेग्नंट असूनही अभिनेत्रीने केला डान्स, Video होतोय Viral

Instagram Trend चं एवढं वेड की प्रेग्नंट असूनही अभिनेत्रीने केला डान्स, Video होतोय Viral

छोट्या पडद्यावरच्या सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) या कपलला ओळखलं जातं. काही महिन्यांपूर्वी या जोडीने गुड न्यूज देऊन ते आई-बाबा होणार असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती.

पुढे वाचा ...
मुंबई, 26 मार्च: छोट्या पडद्यावरच्या सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) या कपलला ओळखलं जातं. काही महिन्यांपूर्वी या जोडीने गुड न्यूज देऊन ते आई-बाबा होणार असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. गुरमीत आणि देबिनाने आपल्या इस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून आपण आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. नुकताच देबिनाच्या डोहाळेजेवणाचा (गोदभराई) कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ देबिनाने शेअर केले आहेत. यामध्ये देबिना लाल रंगाच्या पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत आहे. लाल रंगाच्या ड्रेससोबत देबिनाने मॅचिंग मेकअप केला आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. प्रेग्नंट असूनही यावेळी तिने चक्क एका इन्स्टाग्रामवरील ट्रेंडिंग (Instagram Trending Songs) गाण्यावर डान्सदेखील केलाय. या डान्सचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. देबिनाने अरबी कुट्टू गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ शेअर करून तिने लिहिलं आहे, की 'हे गाणं ट्रेंडिंग होतं, म्हणून मी स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकले नाही.' देबिनाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी लग्नानंतर तब्बल 11 वर्षांनी आई-बाबा होणार आहेत. जेव्हा या जोडप्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आणि चाहत्यांना गुड न्यूज दिली तेव्हापासून चाहते फारच उत्साहित झाले आहेत. या जोडप्याचे मित्र आणि चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. गुड न्यूज शेअर केल्यानंतर देबिना आपल्या प्रेग्नन्सीतले अनुभव यू-ट्यूब व्हिडीओद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रेग्नन्सीमध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल सांगते. तसंच फूड क्रेव्हिंगबद्दलही सांगत असते. हे वाचा-सैफ नव्हे तर 'या' व्यक्तीला घाबरली करिना कपूर, बिर्याणी-हलव्याला केलं Bye-Bye देबिना आणि गुरमीतने 2011 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 2008 मध्ये 'रामायण' या मालिकेत काम करत असताना दोघांमधली जवळीक वाढली होती. या मालिकेत गुरमीतने रामाची भूमिका साकारली होती, तर देबिना सीतेच्या भूमिकेत दिसली होती. दोघंही छोट्या पडद्यावरचं रोमँटिक कपल म्हणून ओळखले जातात. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि फोटो-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. हे वाचा-Alia Bhatt आणि Ranbir Kapoor च्या लग्नाची नवी तारीख आली समोर, काहीच दिवसात चढणार बोहल्यावर? आता देबिनाचे डोहाळेजेवण नुकतेच पार पडले आहे. लवकरच या दोघांच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. चाहते देबिना आणि गुरमीतला आयुष्यातल्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत. तसंच त्यांचे इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी काळजी घेण्यास सांगताना दिसत आहेत.
First published:

Tags: Pregnancy, Tv actress

पुढील बातम्या