Home /News /entertainment /

'यावर पेन किलरसुद्धा उपयोगी नाही...' ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीनंतर अभिनेत्रीची भावुक पोस्ट

'यावर पेन किलरसुद्धा उपयोगी नाही...' ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीनंतर अभिनेत्रीची भावुक पोस्ट

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) छवी मित्तलने (Chhavi Mittal) काही दिवसांपूर्वी आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) झाल्याचा खुलासा करत सर्वानांच धक्का दिला होता. नुकतंच तिच्यावर ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 एप्रिल-  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री   (Tv Actress)  छवी मित्तलने   (Chhavi Mittal)  काही दिवसांपूर्वी आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर  (Breast Cancer)  झाल्याचा खुलासा करत सर्वानांच धक्का दिला होता. नुकतंच तिच्यावर ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर   (Surgery)  होणारा त्रास किती भयानक आणि वेदनादायी असतो, हे आता अभिनेत्रीने एका पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केले आहे. शस्त्रक्रियेनंतर, हॉस्पिटलमधून शेअर केलेल्या एका लांबलचक पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की, तिची वेदना इटली वाढली आहे की कोणत्याही पेन किलरचा देखील परिणाम दिसत नाहीय'.पाहूया अभिनेत्रीची नेमकी पोस्ट. छवी मित्तलने हॉस्पिटलमधून एक फोटो शेअर केला आहे. सोबतच अभिनेत्रीने एक मोठी पोस्टसुद्धा लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने कितीही वेदना झाल्या तरी लढायचे कसे हे आपल्याला माहीत आहे, असे सांगितले आहे. तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये ती वेदनांमधून कशी सावरत आहे हे सांगितले आहे.अभिनेत्रीची पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते तिचं कौतुक करत आहेत. तिच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. छवी मित्तल पोस्ट- फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलंय- 'आपण वेदना किती लवकर विसरतो हे आश्चर्यकारक आहे. सी-सेक्शन नंतर मला जाणवलेली वेदना किंवा वर्षापूर्वी मला अंडाशयाच्या शस्त्रक्रियेनंतर जाणवलेली वेदना…किंवा माझ्या पाठीच्या दुखापतीची त्रासदायक वेदना जी बरी झाली आहे. तीच भावना मी धरून ठेवली आहे जेणेकरून मी ही वेदना विसरू शकेन. मी त्या वेळेवर लक्ष केंद्रित करत आहे, जी काही दिवसांनी येईल, कारण यावेळी खूप वेदना होतात ज्या कोणत्याही पेन किलरने कमी होऊ शकत नाहीत''. तिने पुढे लिहिलंय- 'मला भेटायला येणाऱ्या हितचिंतकांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि तुम्ही पाठवत असलेल्या मेसेजेसनी मला मदत मिळत आहे. या क्षणी टाईप करणे कठीण आहे. अगदी मेसेज दोनदा टॅप करणेसुद्धा. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी शक्य तितके मेसेज वाचत आहे. याबद्दल धन्यवाद. माझ्या सर्जनने मी कोणतीही डान्स रील पोस्ट करू नये, अशी सक्त मनाई केली आहे. परंतु सध्या मी ते करू शकत नाही.'' यासोबतच तिने ती बरी होत असल्याचेही सांगितले आहे'.अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून चाहते भावुक होत आहेत. सोबतच तिला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Instagram post, Tv actress

    पुढील बातम्या