Home /News /entertainment /

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देतेय ब्रेस्ट कॅन्सरशी लढा, इमोशनल पोस्ट लिहीत दिली माहिती

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देतेय ब्रेस्ट कॅन्सरशी लढा, इमोशनल पोस्ट लिहीत दिली माहिती

अलीकडे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. दररोज अशा कित्येक केस आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही महिला डगमगून जातात. तर काही अशा महिला आहेत ज्या धाडसाने या आजाराला सामोऱ्या जातात.

  मुंबई, 16 एप्रिल- अलीकडे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं   (Breast Cancer)  प्रमाण वाढलेलं दिसत आहे. दररोज अशा कित्येक केस आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही महिला डगमगून जातात. तर काही अशा महिला आहेत ज्या धाडसाने या आजाराला सामोऱ्या जातात.यातीलच एक म्हणजे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री छवी मित्तल  (Chhavi Mittal)  होय. छवीने आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनतर तिचे चाहते आणि कलाकार मित्र तिला धीर देत आहेत. आणि ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. छवी मित्तल ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि युट्युबर आहे. ती आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून लोकांना पोट धरून हसायला भाग पाडते. छवीने 3 बहुरानियां, घर की लक्ष्मी बेटीयां आणि कृष्णादासीसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. सोबतच ती स्वतःचं युट्युब चॅनेलदेखील चालवते. परंतु छवीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समजताच, तिचे चाहते चिंतेत आहेत. पण याबाबतीत छवीला दाद द्यायला हवी कारण ती जराही न डगमगता अगदी धाडसाने या परिस्थितीशी लढत आहे.
  अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या आजारपणाची माहिती दिली आहे. छवीने पोस्टमध्ये लिहिलंय, ''डिअर ब्रेस्ट.., हे तुमच्यासाठी कौतुक आहे. मी पहिल्यांदा तुमची जादू अनुभवली,जेव्हा तुम्ही मला आनंदी होण्याची संधी दिली .तुम्ही जेव्हा माझ्या दोन्ही मुलांना फीड केलं तेव्हा तुमचं महत्व प्रचंड वाढलं. पण आज माझी वेळ आहे तुमच्या पाठीशी उभं राहण्याची कारण तुम्ही कॅन्सरशी लढा देत आहात, ही चांगली गोष्ट घडलेली नाहीय. मात्र या गोष्टीमुळे मी डगमगणार नाही. मला माहितेय तुम्ही पुन्हा एकसारखे दिसणार नाही. परंतु मला वेगळी जाणीव करून द्यायची गरज नाहीय. ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत असलेल्या प्रत्येक महिलांसाठी चिअर्स. कारण तुम्हाला माहिती नाही की तुम्ही मला किती प्रेरणा आणि आत्मविश्वास देत आहात''. अभिनेत्रीने शेवटी आपल्याला मेसेज, कॉल करून विचारपूस केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Breast cancer, Entertainment, Health, Lifestyle, Tv actress

  पुढील बातम्या