अखेर 10 महिन्यांनंतर 'या' अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म

अखेर 10 महिन्यांनंतर 'या' अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म

अनेकांना आतापर्यंत गरोदरपणाचे नऊ महिनेच असतात असं माहीत होतं. पण काही महिला 10 महिन्यांच्याही गरोदर असतात. हे खोटं नसून सत्य आहे.

  • Share this:

मुंबई, १४ मे- प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलने मुलाला जन्म दिला आहे. मदर्स डेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ मे रोजी छवीने मुलाला जन्म दिला. छवीचं हे दुसरं आपत्य आहे. याआधी छवीला सहा वर्षांची मोठी मुलगी अरीजा आहे. छवीने तिच्या इन्स्टाग्रामवर मुलाच्या हातासोबत एक फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये तिने मुलाच्या नावाचीही घोषणा केली.

छवीने मुलाचं नाव अरहान हुसैन असं ठेवलं आहे. छवीने पोस्टमध्ये लिहिले की, ’१३ मे रोजी  अरहान हुसैनची आई झाले. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार. मी सध्या रुग्णालयात असून मी माझी नव्याने जन्मल्याची गोष्ट लवकरच सांगेन.’ 35 वर्षीय छवीने २००५ मध्ये टीव्ही दिग्दर्शक मोहित हुसैनशी लग्न केलं होतं. दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यावर छवी सातत्याने आपले डाएट, व्यायाम आणि एकंदरीत अनुभव सोशल मीडियावर शेअर करत होती. छवीने मुलाला १०व्या महिन्यात जन्म दिला आहे.

...म्हणून ‘या’ दिग्गज मराठमोळ्या गायकाने माधुरीला दिला होता लग्नासाठी नकार

१० वा महिना लागल्यावर छवीने यासंबंधीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. सर्वसामान्यपणे ९ व्या महिन्यात मुलांचा जन्म होतो. पण छवीने जेव्हा ती १० महिन्यांची गरोदर असल्याची पोस्ट टाकली तेव्हा अनेकांनी तिला तू चुकून ९ ऐवजी १० वा महिना लिहिला असं सांगितलं. मात्र छवीने ते चुकून न लिहिता जाणीवपूर्वक लिहिल्याचं स्पष्ट केलं.

तब्बल 12 वर्षांनंतर ब्रेकअपवर बोलला शाहिद, ‘तिच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर आयुष्य ब्लॅक अँड व्हाइटसारखं झालं होतं.’

‘अनेकांना आतापर्यंत गरोदरपणाचे नऊ महिनेच असतात असं माहीत होतं. पण काही महिला 10 महिन्यांच्याही गरोदर असतात. हे खोटं नसून सत्य आहे. सध्या मी ते आयुष्य जगत आहे. अनेकांना वाटलं मी चुकीचं लिहिलं आणि ते माझी चूक सुधारत होते. पण हे चुकीचं नसून जाणीवपूर्वक पद्धतीने लिहिले आहे. जेव्हा नववा महिना संपतो त्यानंतर 10 वा महिना सुरू होतो. गरोदरपणात 36 आठवड्यांनंतर कधीही प्रसुती होऊ शकते. 40 आठवडे हा पूर्ण काळ समजला जातो आणि त्यावेळी डॉक्टर तुम्हाला तारीख देतात.’

शाहरुख खानसोबत काम केलेल्या या सहा अभिनेत्रींचा झालाय मृत्यू, एकीचं वय तर होतं फक्त 22 वर्ष

तुम्हाला कधी प्रसुती वेदना येतील याबद्दल ठामपणे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या तारखाही बदलू शकतात. त्यातही तुम्ही जर दुसऱ्यांदा गरोदर होत असाल तर कधी कधी तुम्ही 42 आठवड्यांपर्यंतही गरोदर राहू शकता. यात जगावेगळं असं काही नाही. सध्या मी फार निवांत आहे. कारण मला माहीत आहे जेव्हा बाळ या जगात येईल मला एक मिनिटाचीही उसंत मिळणार नाही. त्यामुळे प्रसुती वेदना कधी येणार हे माझ्या किंवा डॉक्टरांच्या हातात नसून हे पूर्णपणे बाळाच्या हातात आहे.

घटस्फोटानंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री एकटी सांभाळतेय मुलीला

SPECIAL REPORT: तापसी आणि भूमीचं अनोखं मदर्स डे सेलिब्रेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2019 01:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading