होळीला 'या' अभिनेत्रीच्या कारवर दारुड्यांनी केला हल्ला, एकटीने चपलेने मारलं

होळीला 'या' अभिनेत्रीच्या कारवर दारुड्यांनी केला हल्ला, एकटीने चपलेने मारलं

दारुड्यांनी चाहतच्या चालकाला मारलं आणि स्क्रीन शील्डही तोडलं. यावेळी चाहतने आजूबाजूच्या लोकांकडे मदत मागितली पण कोणीही तिला मदत केली नाही.

  • Share this:

मुंबई,23 मार्च- दरवर्षी देशभरात होळी आणि रंगपंचमी उत्साहाने साजरी केली जाते. पण, या दोन दिवसांमध्ये रंगाचा बेरंग करणारेही असतात. दारू पिऊन हंगामा करतात आणि इतर नागरिकांना त्रास देतात. नुकताच असा एक अनुभव टीव्ही अभिनेत्रीला आला. रिपोर्ट्सनुसार, होळीच्या दिवशी अभिनेत्री चाहत खन्ना कामानिमित्त घराबाहेर पडली. यावेळी अचानक १० ते १५ अज्ञात व्यक्तिंनी तिच्यावर हल्ला केला. या लोकांनी मिळून असा काही गोंधळ घातला की, सुरुवातीला चाहत फारच घाबरली. पण तरीही एकटीने त्या मुलांना चांगलीच अद्दल घडवली.

संध्याकाळी ७ वाजता चाहत एका कामानिमित्त मालाडहून गाडीतून जात होती. दरम्यान, १० ते १५ दारुड्यांनी तिच्या गाडीच्या समोर गोंधळ घालायला सुरुवात केली. दारुड्यांनी चाहतच्या चालकाला मारलं आणि स्क्रीन शील्डही तोडलं. यावेळी चाहतने आजूबाजूच्या लोकांकडे मदत मागितली पण कोणीही तिला मदत केली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चाहत लगेच गाडीतून बाहेर आली आणि तिने पोलिसांना फोन केला. याकाळात तिच्या मदतीला कोणीही आलं नाही. अखेर चाहत एकटीच त्या गुंडांशी लढायला लागली. चालकाला वाचवण्यासाठी तिने दारुड्यांना मारायला सुरुवात केली. तिने त्यांना अक्षरशः चपलेने मारले.

चाहत खन्नाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिचं खासगी आयुष्य फार कष्टदायी आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आईचं निध झालं. याचं दुःख तिने सोशल मीडियावर व्यक्त केलं होतं. तर २०१८ मध्ये तिचा पती फरहान मिर्झाशी घटस्फोट झाला. चाहतने नवऱ्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला होता. चाहतने ‘कबूल है’ मालिकेत काम केलं आहे.

VIDEO: महिलेची छेड काढणाऱ्या साधूला नागरिकांनी फलाटावरच दिला प्रसाद

First published: March 23, 2019, 5:28 PM IST
Tags: tv actress

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading