ब्रेकअप के बाद! 6 वर्षांचं नातं तुटल्यावर अभिनेत्रीनं सांगितलं रिलेशनशिपचं सत्य

ब्रेकअप के बाद! 6 वर्षांचं नातं तुटल्यावर अभिनेत्रीनं सांगितलं रिलेशनशिपचं सत्य

अभिनेत्री आशा नेगीनं तिच्या ब्रेकअप आणि रिलेशनशिपवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : बॉलिवूड असो वा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ब्रेकअप आणि घटस्फोट या गोष्ट नव्या नाहीत. अनेकदा नवी नाती जुळायला आणि अनेक वर्षांची नाती तुटायला या ठिकाणी फारसा वेळ लागत नाही. अशात काही दिवसांपूर्वी टीव्हीच्या सर्वात लोकप्रिय कपलचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. टीव्ही अभिनेता ऋत्विक धनजानी आणि आशा नेगी यांचं काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झालं. मात्र त्यांची मैत्री अद्याप कायम आहे. आता अभिनेत्री आशा नेगीनं त्यांच्या ब्रेकअप आणि नात्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री आशा नेगीनं नुकतीच पिंकव्हिला या वेबसाइट मुलाखत दिली. ज्यात तिनं तिच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. रिलेशनशिप स्टेटसबाबात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, लोक वेगळे होतात, नाती तुटून जातात. पण आयुष्यातली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आपण त्या व्यक्तीसोबतच्या आठवणी नेहमीच आपल्यासोबत ठेवतो.

Lockdwon: 'नागिन 4' फेम अभिनेत्रीचं लग्न रखडलं, आता सतावतेय घराच्या EMI ची चिंता

 

View this post on Instagram

 

Happy birthday mad one! Thankyou for being YOU💙✨ @rithvik_d

A post shared by MsNegi (@ashanegi) on

आशा म्हणाली, मी माझ्या पर्सनल लाइफबद्द फारसं बोलणार नाही. हां मात्र एक गोष्ट नक्कीच सांगेन की, आमच्या दोघांमध्ये तो सन्मान नक्कीच राहणार आहे. आशाच्या या बोलण्यातून तिच्या तुटलेल्या नात्याबाबतचं दुःख स्पष्ट दिसत होतं. आशा आणि ऋत्विक यांची ओळख पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर झाली होती. दरम्यान दोघंही एकमेकांच्या जवळ आले. 2013मध्ये त्यांनी हे नातं ऑफिशिअल केलं होतं. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या लग्नाच्या अफवा सुद्धा उडाल्या होत्या मात्र ऋत्विकनं स्वतः याबाबत नकार देत या चर्चांना पूर्णविराम लावला.

 

View this post on Instagram

 

The story of the red princess and the monkey head @rithvik_d ...💛💙✨✨✨ #delhidiaries 📸 @shivanibengani ✨

A post shared by MsNegi (@ashanegi) on

काही दिवसांपूर्वी आशाची वेबसीरिज 'बारिश सीझन 2' रिलीज झाली होती. त्यानंतर ऋत्विकनं तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. त्याची इन्स्टाग्राम पोस्ट आशानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती.

एवढी अलिशान आहे सोनम कपूरची बेडरुम, पाहा तिच्या घराचे INSIDE PHOTOS

अभिनेत्रीनं केला पोल डान्स, BOLD VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

First published: May 13, 2020, 10:03 AM IST

ताज्या बातम्या