मुंबई, 15 जानेवारी: पहिलं प्रेम (Love) विसरणं फार कठीण असतं, असं म्हटलं जातं. कदाचित खरं असावं हे. कारण दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत (Sushant singh rajput) आणि अंकिता लोखंडे (Ankita lokhande) या दोघांचा ब्रेक अप (Break Up) खुप पूर्वी झाला आहे. पण अंकिता सुशांतला अद्यापही विसरू शकली नसल्याचं दिसत आहे. तिनं नुकतंच सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मकर संक्रांतीच्या (Makarsankranti festival) निमित्तानं अंकिता लोखंडेला दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची पुन्हा आठवण झाली आहे. तिने पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणींना ताजं करणारा एक भावनिक व्हिडीओ (Emotional video) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अंकिता लोखंडेने मकर संक्रांतीच्या निमित्ताने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पतंग उडवताना दिसत आहे. ज्यामध्ये व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला सुशांत सिंह राजपूतच्या 'काय पो चे!' (Kai Po Che) चित्रपटातलं गाणं वाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अंकितानं कॅप्शनमध्ये लिहिलं की- 'हे गाणं ऐकताना आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो. हा एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटाचा प्रवास आणि आठवणी न विसरता येणाऱ्या आहेत.'
View this post on Instagram
हा व्हिडिओ तन्मय खुटलने एडिट केला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत, असून अनेक बॉलिवूड कलाकार आणि सुशांतचे चाहते अंकिताच्या या व्हिडीओवर कमेंटही करत आहेत. त्याली एका चाहत्यानं लिहिलं की, लोक निघून जातात, पण त्यांच्या आठवणी हृदयात एक कथा म्हणून तशाच राहतात. शिवाय सुशांतच्या काही चाहत्यांनी संदीप सिंगला उद्देशून प्रश्न विचारत आहे.
(हे वाचा- तारीख ठरली! या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी)
अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत काही वर्षांसाठी रिलेशनशिपमध्ये होते. 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेतून दोघांची जवळीक वाढली होती. 2011 मध्ये डान्स शो 'झलक दिखला जा'च्या सेटवर सुशांतसिंग राजपूतने अंकिताला प्रपोज केलं होतं. 2013 मध्ये जेव्हा 'काय पो छे' चित्रपटाचं प्रिमीयर झाला होता, तेव्हा अंकिता लोखंडे सुशांतबरोबर रिलेशनशीप होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.