मुंबई, 27 मे- 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' सिनेमात झलकारी बाई ही व्यक्तिरेखा साकारणारी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'मणिकर्णिका' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अंकिताने नुकताच एक भलामोठा फ्लॅट विकत घेतला आहे. अंकिताने हा फ्लॅट प्रियकर विकी जैनसोबत मिळून घेतला आहे.
असं म्हटलं जातं की, अंकिता आणि विकी येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दोघांनी 8 बीएचकेचा फ्लॅट विकत घेतला आहे. रिपोर्टनुसार, अंकिताला आता आयुष्यात सेटल व्हायचे असून तिला लग्न करायचं आहे. अंकिता आणि विकीने जो फ्लॅट विकत घेतला आहे तो अंडर कंस्ट्रक्शन आहे.
शाहरुखच्याआधी सलमाननेच घेतला असता मन्नत बंगला, पण...
विकीआधी अंकिता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतला डेट करत होती. दोघं अनेक वर्ष लिव्हइनमध्येही होते. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली. २०१६ पर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केलं. अंकितासाठी या ब्रेकअपमधून बाहेर येणं फार कठीण होतं. अनेक वर्ष ती ब्रेकअपचं दुःख स्वतःसोबत बाळगत होती. पण हळूहळू मित्र विकीमध्ये ती गुंतत गेली आणि त्यांचं नातं पुढे सरकत गेलं. आता दोघं लग्न करण्याचा विचार करत आहेत.
करण जोहर सांगतो, ‘कोणासोबत सेक्स करायचं’; रंगोलीच्या आरोपांनी बॉलिवूडकरांची उडाली झोप
View this post on Instagram#ankitalokhande with #vickyjain ❤️❤️ at a wedding of a friend
यावर्षी एप्रिल महिन्यात अंकिता आणि विकीचा किस करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मुंबईत एका लग्नात दोघांचे अनेक व्हिडिओ समोर आले होते, ज्यावरून अंकिता आणि विकी एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्ट झालं होतं. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने काही व्हिडिओ शेअर केले होते, ज्यात दोघं बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. याचवेळी अंकिताने विकीला मिठी मारत किस केलं होतं.
Bigg Boss Marathi 2- आता हे 15 मराठमोळे सेलिब्रिटी भिडणार एकमेकांना
अंकिता आणि विकीच्या लग्नाची अफवा मणिकर्णिका सिनेमा प्रदर्शित होण्याच्या वेळेपासूनच सुरू आहे. त्यावेळी अंकिताने स्पष्ट केलं होतं की, ‘जर असं काही झालं तर मी तुम्हाला नक्की सांगेन आणि बोलवेनही... मी आता काही सांगू शकत नाही. सध्या तरी असा कोणताच विचार डोक्यात नाही. मी आता फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे.’
बाबांच्या आठवणीत भावुक झाले रितेश- जेनेलिया देशमुख, म्हणाले...
राज्यात मान्सून लांबण्याची शक्यता, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी