मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'लग्न कधी करणार ?' यावर अंकिता लोखंडेची अशी होती प्रतिक्रिया, Video Viral

'लग्न कधी करणार ?' यावर अंकिता लोखंडेची अशी होती प्रतिक्रिया, Video Viral

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरच प्रियकर विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नगाठ बांधणार आहे.आता अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 30 नोव्हेंबर- टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरच प्रियकर विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नगाठ बांधणार आहे. लग्नापूर्वी अंकिताने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तिच्या गर्ल गँगसाठी बॅचलर पार्टीही ठेवली होती. पार्टीला अपर्णा दीक्षित, मृणालिनी त्यागी आणि इतर उपस्थित होते.आता अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओबाबत चर्चा आहे की, अभिनेत्रीने तिच्या भावी पतीसोबत(Ankita Lokhande Vicky Jain Wedding) लग्नपत्रिका वाटण्यास सुरुवात केली आहे.

विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मीडिया फोटोग्राफर विकी आणि अंकिता यांना लग्नाविषयी विचारत आहेत. 'लग्नाचा हंगाम सुरू आहे, तुम्ही लोक लग्न कधी करणार आहात.' हा प्रश्न ऐकून अंकिता लोखंडे हसली आणि पुढे निघून गेली. त्याचवेळी विकी म्हणतो- 'सगळं होणार आहे'.

वाचा :नीतू कपूर-ऋषि कपूर यांच्या आठवणीत भावुक; थ्रोबॅक फोटो शेअर करत केलं मनमोकळं

अंकिता आणि विकीचे लग्न तीन दिवस चालणार आहे जे 12 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि 14 डिसेंबरला संपणार आहे. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसासाठी, दोघांनी मुंबईतील एक 5-स्टार हॉटेल निवडले आहे. अंकिता तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या चाहत्यांना लग्नाच्या तयारीची झलक दाखवत असते. काही अपडेट शेअर करत असते.

वाचा :प्रेक्षकांना याड लावणाऱ्या मालिका विश्वातील टॉप टेन नायिका माहिती आहेत का?, पाहा PHOTO

याआधी 10 नोव्हेंबरला तिने तिच्या 'ब्राइड टू बी' सँडलची भरतकाम केलेले फोटो शेअर केली होते. अंकिता आणि विकी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कठीण प्रसंगी दोघेही एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. बॉलीवूड अभिनेता आणि माजी प्रियकर सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अंकिताची वाईट अवस्था झाली आणि त्यावेळीही विकी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

अशा परिस्थितीत जेव्हा विकी ट्रोल झाला तेव्हा अंकिता त्याच्या समर्थनात पुढे आली. अंकिता तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचे काही फोटो शेअर करत नेहमीच अपडेट देते. ती अनेकदा सोशल मीडियावर विकीसोबतचे क्यूट फोटो शेअर करत असते.

First published:

Tags: Ankita lokhande, Bollywood actress, Entertainment, TV serials