मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नात विघ्न! अभिनेत्री रुग्णालयात दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नात विघ्न! अभिनेत्री रुग्णालयात दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अंकिता लोखंडे आणि विकी जैन (Ankita Lokhande Vicky Jain Wedding) त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, अंकितासोबत एक घटना घडली असून, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन (Ankita Lokhande Vicky Jain Wedding) त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, अंकितासोबत एक घटना घडली असून, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन (Ankita Lokhande Vicky Jain Wedding) त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, अंकितासोबत एक घटना घडली असून, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 8 डिसेंबर : अंकिता लोखंडे आणि विकी जैन (Ankita Lokhande Vicky Jain Wedding) त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, अंकितासोबत एक घटना घडली असून, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पायाला दुखापत झाल्याने अंकिताला काल रात्री सबअर्बन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिंकविलाच्या वृत्तानुसार, “अंकिताच्या पाय मुरगळा आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे पण डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. विकी जैन आणि अंकिता लोखंडे 12-14 डिसेंबरला लग्न करणार आहेत.

अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) हिच्या पायाला दुखापत होण्यामागचे कारण समजू शकलेले नाही. मात्र या बातमीनंतर चाहते तिच्या लग्नाबाबत विविध अंदाज लावत आहेत. डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत अंकिता तिच्या लग्नाची तयारी योग्य पद्धतीने करू शकणार नाही. लग्नापर्यंत अंकिता पूर्णपणे बरी होईल की नाही, अशी भीती चाहत्यांच्या मनात आहे. आता, हे येत्या काळात कळेलच.

वाचा :फायनली स्वीटू येणार नांदायला तेही ओमच्या घरी; लग्नाचा video व्हायरल

यापूर्वी अंकिता लोखंडेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर (Ankita Lokhande Instagram) तिच्या लग्नाआधीच्या काही कार्यक्रमांचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि विकी जैन दोघेही मुंडावळ्या बांधताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरील हास्य हे दोघेही खूप आनंदी असल्याचे सांगत आहेत. अंकिता आणि विकी या दोघांच्याही डोक्यावर मुंडावाळ्या बांधलेले दिसत आहेत. दोघांचे लग्नाआधीचे कार्यक्रम मराठी रितीरिवाजानुसार पार पडत आहेत. हा व्हिडिओ 52 सेकंदांचा आहे.

वाचा :कॉमेडी किंग Kapil Sharmaचा भाऊ आहे पोलीस; जाणून घ्या, कपिलच्या फॅमिलीबद्दल

या व्हिडिओची सुरुवातील हवत व त्यातून बाहेर पडणारा अग्नी अशी होते. यानंतर अंकिता डोक्यावर मुंडावळ्या बांधताना दिसते आणि पायात पैंजण घालताना दिसत आहे. त्यानंतर विकी जैनची झलक पाहायला मिळते. विकीच्या डोक्यालाही मुंडावळ्या बांधलेल्या आहेत आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या महिला हसत आहेत. त्यानंतर या सोहळ्याचे विधी दाखवले जातात. पंडित काही मंत्र म्हणत आहेत आणि अंकिता हात जोडून बसली आहे.

यानंतर अंकिता आणि विकी विक्की (Ankita Lokhande Vicky Jain Pre Wedding Video) दोघेही एकत्र बसलेले दिसतात आणि अंकिता काहीतरी खाताना दिसते. अंकिताचे वडिलही हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहेत. अंकिता तिच्या वडिलांचे आशीर्वाद घेते. हा व्हिडीओ शेअर करत अंकिताने लिहिले होते की, ,‘टूगेदरनेस! यासोबत रेड हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.

First published:

Tags: Ankita lokhande, Bollywood News, Entertainment, Tv actress, TV serials