बाळासाठी आईचं दूध किती महत्वाचं? अनिता हसनंदानीने सांगितलं 'स्तनपान'चं महत्व

बाळासाठी आईचं दूध किती महत्वाचं? अनिता हसनंदानीने सांगितलं 'स्तनपान'चं महत्व

छोट्या पडद्यावरील ‘ये है मोहबत्तें’ (Ye Hai Mohabbatain) या मालिकेतील ‘शगुन’ (Shagun) म्हणजेच अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hasnanadani) नुकतीच आई बनली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मे-  आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोठं सौभाग्य असतं. सर्वसामान्य स्त्री असो किंवा सेलेब्रेटी दोघींनाही आपल्या मुलाबद्दल तितकचं प्रेम आणि काळजी सुद्धा असते. छोट्या पडद्यावरील ‘ये है मोहबत्तें’ (Ye Hai Mohabbatain)  या मालिकेतील ‘शगुन’ (Shagun)  म्हणजेच अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hasnanadani) नुकतीच आई बनली आहे. त्यामुळे ती आई होण्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. आणि आपल्या मुलासोबतचे हे अनुभव सोशल मीडियावर सुद्धा शेयर करत असते. नुकताच अनिताने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम वर पोस्ट केला आहे. त्यामध्ये अनिताने स्तनपान(Breastfeeding) करने का आवश्यक आहे, याबद्दल माहिती दिली आहे. यामुळे अनिताचं सोशल मीडियावर मोठं कौतुकसुद्धा होतं आहे.

View this post on Instagram

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

‘ये है मोहबत्तें’ मध्ये एक स्टाईलिश आणि उद्धट असणारी शगुन, म्हणजेच अनिता आपल्या रिअल लाईफमध्ये किती सुंदर आणि प्रेमळ आई आहे हे आपल्याला सतत पाहायला मिळत. अनिताने नुकताचं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिनं बाळासाठी स्तनपान कसं महत्वाचं आहे, हे सांगितलं आहे.

‘अनिताने म्हटलं आहे, ‘ज्यावेळी मी माझ्या मुलाला जन्म दिला. तेव्हा माझं माझ्या डॉक्टरांशी बोलणं झालं, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं. आईच्या दुधामध्ये त्या अँटीबॉडीज मोठ्या प्रमाणात असतात जी बाळाच्या इम्यूनीटी वाढवण्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त असतात. तसेच आईचं दुध हेचं बाळासाठी सर्वात उत्तम पोषण असतं. त्यामुळे मी पटकन निर्णय घेतला काही झालं तरी आपल्या मुलाला आपण योग्य स्तनपान करायचं. मी जोपर्यंत करू शकते तोपर्यंत मी माझ्या मुलाला स्तनपान करणार. जवळजवळ सहा महिने तर हे मी नक्की करणार.

(हे वाचा: करीना कपूर पोहोचली नानावटी रुग्णालयात; चाहत्यांना वाटतेय 'बेबो'ची काळजी )

अनिताने फेब्रुवारीमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिने आपल्या मुलाचं नाव आरव असं ठेवलं आहे. हळूहळू आरव मध्ये कोणकोणते बदल होतं आहेत, याबद्दल ती सोशल मीडियावर सांगत असते. सतत आपल्या मुलासोबतचे व्हिडीओ आणि फोटो ती चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. अनिताचीही पोस्ट पाहून चाहते तिचं भरभरून कौतुक करत आहेत.

Published by: Aiman Desai
First published: May 7, 2021, 6:45 PM IST

ताज्या बातम्या