'सांस भी कभी बहू थी'फेम पायलकडे आईच्या उपचाराला पैसे नाहीत

छोट्या पडद्यावरची 'सांस भी कभी बहू थी' हिट मालिका तुम्हाला आठवत असेल. त्या मालिकेत पायलची भूमिका साकारणारी जया भट्टाचार्यची परिस्थिती फारशी बरी नाहीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2017 07:26 PM IST

'सांस भी कभी बहू थी'फेम पायलकडे आईच्या उपचाराला पैसे नाहीत

12 डिसेंबर : छोट्या पडद्यावरची 'सांस भी कभी बहू थी' हिट मालिका तुम्हाला आठवत असेल. त्या मालिकेत पायलची भूमिका साकारणारी जया भट्टाचार्यची परिस्थिती फारशी बरी नाहीय. तिची आई आजारी आहे. आणि तिला तिच्या उपचारासाठी पैसे हवेत. त्यासाठी ती शोधतेय काम.

एका मुलाखतीत ती म्हणाली, ' माझी आई 79 वर्षांची आहे. तिला हृदयाचा आजार आहे. ती आयसीयूमध्ये आहे. सध्या मी माझ्या एका मानलेल्या भावाकडे राहते. पण मला कुणाचाच आधार नाही.मला काम हवंय.'

जया आसामची आहे. नुकतीच ती 'थपकी प्यार की'मध्ये काम करत होती. तिने अनेक सिनेमे, मालिकांमध्ये काम केलंय. कसम से, केसर, हातिम अशा मालिकांमध्ये ती चमकलीय. पण आता तिची प्रचंड आर्थिक चणचण आहे, हेच खरं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...