Home /News /entertainment /

ना लाखोंचा खर्च ना Destination Wedding; अवघ्या 150 रुपयात पार पडला प्रसिद्ध अभिनेत्याचा लग्नसोहळा

ना लाखोंचा खर्च ना Destination Wedding; अवघ्या 150 रुपयात पार पडला प्रसिद्ध अभिनेत्याचा लग्नसोहळा

अभिनेता विराफ पटेल (Viraf Patel) आणि अभिनेत्री सलोनी खन्ना(Saloni Khanna) यांचा कोरोनामुळे आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला आहे.

  मुंबई, 8 मे : सध्या कोरोना महामारीने(Coronavirus)  देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे लग्नसमारंभावर देखील अनेक बंधने आली आहेत. त्यामुळे फक्त कुटुंबीयासोबतचं लग्नं सोहळा पार पाडावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकताच एक अतरंगी विवाह सोहळा पार पडला आहे. अभिनेता विराफ पटेल (Viraf Patel) आणि अभिनेत्री सलोनी खन्ना(Saloni Khanna)  यांचा हा विवाह सोहळा होता. आता अभिनेता आणि अभिनेत्री म्हटल्यावर तुमच्यासमोर अगदी मालिकांसारखा सेट उभा राहिला असेल. मात्र तुम्हाला विश्वास बसणार नाही. हा लग्नं सोहळा फक्त आणि फक्त 150 रुपयांमध्ये पार पडला आहे. झाला नं अवाक्. हे खर आहे या दोन्ही कलाकारांना कोरोनामुळे हा आगळावेगळा लग्नसोहळा करावा लागला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Viraf Patell (@virafpp)

  सध्या सोशल मीडियावर या लग्नाची मोठी चर्चा होतं आहे. आणि हे होणं साहजिकचं आहे. कारण अभिनेत्री असणाऱ्या सलोनीने चक्क उधारीवर आणून साडी नेसली होती. तर अभिनेत्याने लग्नात अंगठी म्हणून रबर बँडचं देऊ केलं आहे. तर पाहुणे मंडळीनी झूम कॉलवरून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती लावली होती. विराफ आणि सलोनी यांनी कोर्टमेरेज केलं आहे. या दोघांनी अवघ्या एका तासात आपलं लग्न आटोपल आहे. सलोनीने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून या सर्वाची माहिती दिली आहे.
  सध्या कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे. आणि त्यामुळे लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता, इतर कोणतीही दुकाने सुरु नाहीयेत. त्यामुळे या दोघांनाही आपल्या लग्नासाठी काही खरेदीचं करता आली नाही त्यामुळे या दोघांनी हा जुगाड केला आहे. (हे वाचा:'बिग बॉस' फेम अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक; कारण ऐकून व्हाल थक्क  ) ‘नामकरण’ या मालिकेतून विराफला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. तसेच विराफने एक बुंद इश्क, माही वे, रिश्ता डॉट कॉम यांसारख्या कार्यक्रमांत काम केल आहे. तर सलोनी खन्नाने ‘द रायकर केस’ या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे.ना लाखोंचा खर्च ना Destination Wedding; अवघ्या 150 रुपयात पार पडला प्रसिद्ध अभिनेत्याचा लग्नसोहळा
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Instagram post, Marathi entertainment, Tv actors, Wedding

  पुढील बातम्या