मुंबई, 22 मार्च: बिग बॉस 13 चा (Big Boss 13) विजेता आणि बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. तो विविध फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो. यामुळे युवा वर्गात त्याची फॅन फॉलोविंगही खूप जास्त आहे. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वीच सिद्धार्थचे चाहते मोठ्या प्रमाणात होते. पण बिग बॉस 13 चा विजेता झाल्यानंतर त्याच्या फॅन फोलोविंगमध्ये आणखीच भर पडली.
सिद्धार्थनं (Siddharth Shukla) अलीकडंच एक ट्विट (tweet) केलं आहे, ज्यामुळे त्याला नेटकऱ्यांच्या ट्रोलचा (Get trolled) सामना करावा लागला आहे. खरंतर त्याने ट्विटच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला अनेक नेटकऱ्यांनी पुरतं घेरलं आहे. सिद्धार्थनं ट्विट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं की, 'मी जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा माझ्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा. एक शिक्षक जर सर्व विषय शिकवू शकत नसेल. तुम्ही एका विद्यार्थ्याला सर्व विषय शिकले पाहिजेत, अशी अपेक्षा कशी काय करू शकता?'
Shuklaji bro.. aap bataye .. if u were a education minister bro.. what type of change u will do in the current system bro?? Aap bata sakte hai Bro 😎😎 pic.twitter.com/HWYoiOjuY3
— Anu (@Anu_SidNaazian) March 20, 2021
सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांनी त्याच्या ट्विटचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी सिद्धार्थ शुक्लाच्या शिक्षण व्यवस्थेविषयीच्या तार्किक प्रश्नाचं कौतुक केलं आहे. आतापर्यंत 24 हजाराहून अधिक लोकांनी सिद्धार्थचं हे ट्विट पसंत केलं आहे, तर सात हजारहून अधिक चाहत्यांनी त्यांचं ट्विट रिट्वीट केलं आहे. काही चाहत्यांनी त्याच्या मताचं कौतुक केलं आहे, तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे.
हे ही वाचा -मि. परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खानला हवेत इंटर्न्स; काम काय, किती पगार पाहा
बिग बॉस विजेता झाल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला काही म्युझिक व्हिडिओंमध्ये झळकला आहे. या व्हिडिओंमध्ये तो शहनाज गिलसोबत दिसला होता. तसेच 'ब्रोकन बट ब्युटीफुल 3' या वेब सीरीजमध्येही तो दिसणार आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ शुक्लानं 'खतरों के खिलाडी' या पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं होतं. या व्यतिरिक्त सिद्धार्थ 'बालिका वधू' या टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे. त्याचबरोबर 2014 सालच्या करण जोहरच्या 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Education, Entertainment, Siddharth shukla, Social media viral, Tv actor