मुंबई, 15 मे- प्रसिद्ध टीव्ही शो प्यार के पापड मालिकेतील कलाकार प्रतीश वोरा यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा ७ मे रोजी घशात खेळणं अडकून मृत्यू झाला. प्रतीश यांच्या मुलीने प्लॅस्टिकचं खेळणं घशात घातलं. ते घशात अडकल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आता मुलीच्या या अपघाती मृत्यूबद्दल प्रतीश यांनी सांगितलं. मुलीला वाचवण्यासाठी मुलीच्या घशातून ते खेळणं काढण्याचा कसे अथक प्रयत्न करण्यात आले ते सांगितलं. पण त्यांच्या मुलीला ते वाचवू शकले नाही.
स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रतिश म्हणाले की, ‘आम्ही घरी पिझ्झा खात होतो. घरी माझे काही मित्रही आले होते. माझी पत्नी आणि मुलगी मुंबईत राहतच नाही. दोघी राजकोटमध्ये राहतात. पण सुट्टीसाठी म्हणून दोघी मुंबईत आले होते. जेव्हा तिने खेळताना प्लॅस्टिकचं खेळणं तोंडात घालून गिळलं तेव्हा मी लगेच तिच्या तोंडात हात घालून तो प्लॅस्टिकचा तुकडा काढण्याचा प्रयत्न केला. पण तोवर तिने तो तुकडा गिळला होता आणि माझा हात तिथपर्यंत पोहचू शकत नव्हता. मी तिच्या तोंडात जेव्हा हात घातला तेव्हा ती घाबरलेली असल्यामुळे तिने मला जोरात चावलं. अवघ्या काही मिनिटांत सगळं संपलं...’
VIDEO- गोडसे नाही जिना होते पहिले दहशतवादी, कमल हसनच्या वक्तव्यावर या अभिनेत्रीने दिले प्रत्यत्तर
View this post on Instagram
बाबांची लाडकी लेक माधुरी आजही आपल्या आईची तेवढीच घेते काळजी
माझ्या चिमुरडीला घेऊन आम्ही मिरा रोडच्या रुग्णालयात गेलो. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही रुग्णालयात पोहोचलो होतो. पण तोवर तिच्या तोंडून रक्त यायला सुरुवात झाली होती. डॉक्टरांनी रक्त थांबवलं होतं पण तिच्या हृदयाचे ठोके कमी होत होते. ऑक्सिजनचं प्रमाणही ठीक होतं पण शरीरातला कार्बनडाय ऑक्साइड बाहेर पडत नव्हता. काही वेळाने आम्हाला सांगण्यात आलं की ती ठीक आहे. पण २४ ते ४८ तासांसाठी तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे. पण यादरम्यान रक्तस्त्राव पुन्हा सुरु झाला आणि तिचे हृदयाचे ठोके पुन्हा कमी पडू लागले. डॉक्टरांनी रात्री १ वाजेपर्यंत तिला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण ते तिला वाचवू शकले नाही.’
बापरे! इतक्या कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे भोजपुरी सुपरस्टार रवी किशन
प्रतीश पुढे म्हणाले की, ‘माझ्या पत्नीला सांभाळणं ही माझी पहिली आणि सर्वात मोठी जबाबदारी आहे. खरं सांगायचं तर मी रडूही शकत नाही. पण ती फार कणखर आहे. लवकरच ती यातून बाहेर पडेल.’ प्रतीश यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा आणि क्राइम पेट्रोल या मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या ते प्यार के पापड या मालिकेत नंदू गुप्ता ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.
VIDEO: 'कोई टच भी नही कर सकते', टिक टॉक व्हिडीओ करणं पडलं महागात!