मुंबई, 08 जून- टीव्ही अभिनेता क्रिप कपूर सूरी सध्या त्याच्या आगामी विष मालिकेमुळे चर्चेत आला आहे. या मालिकेत क्रिप नकारात्मक भूमिका साकारणार आहे. पण याशिवाय क्रिप एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. क्रिपचं वैवाहिक जीवन फारसं चांगलं चाललेलं नाही. क्रिप आणि त्याची पत्नी लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. मात्र असं काहीही होणार नसल्याचं क्रिपने सांगत त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
एका मुलाखतीत क्रिपने सांगितलं की, ६ सप्टेंबर २०१४ मध्ये त्याचं लग्न झालं होतं आणि त्याच दिवशी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. यामुळे क्रिपने त्याच्या पत्नीला फक्त सिंदूर लावूनच घरी आणलं होतं. यानंतर लोकांनी सिमरनला टार्गेट करत तिच्याबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलायला सुरुवात केली होती. तसेच क्रिपसाठी ती अशुभ असल्याचंही अनेकांनी म्हटलं होतं.
वेस्टर्न लुकवर मंगळसूत्र, प्रियांका चोप्राचा हा देसी अवतार पाहाच
आपल्या पत्नीची बाजू मांडताना क्रिप म्हणाला की, सिमरनला दोष देण्यापूर्वी लोकांना हे कळलं पाहिजे की, माझ्या करिअरमधला पहिला ब्रेक मला लग्नानंतरच मिळाला होता. सिमरन माझ्यासाठी फार लकी आहे. तिने माझी साथ कधीच सोडली नाही आणि माझं तिच्यावर भरपूर प्रेम आहे.
जिमच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद झाला इम्रान खान, ओळखताही येणं अशक्य
चर्चेत आहेत क्रिप- सिमरन
क्रिप आणि सिमरन दोघंही सोशल मीडियावर फार सक्रीय आहेत. असं म्हटलं जातं की, क्रिप आपल्या को-स्टारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे तर सिमरन तिच्या ऑफिसमधील एका व्यक्तिला डेट करत आहे. याबद्दल स्पष्टीकरण देताना क्रिप म्हणाला की, ऑनस्क्रीन जर तुम्ही कोणासोबत चांगले दिसत असाल तर याचा अर्थ हा नाही की खऱ्या आयुष्यातही तुम्ही त्यांच्यासोबत नात्यात असाल.
घटस्फोटाच्या एक वर्षानंतरच ज्वाला गुट्टाला डेट करतोय हा अभिनेता
VIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी