मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /करणवीर बोहराला दिल्ली एअरपोर्टवर रोखलं, वाचा नेमकं घडलं तरी काय

करणवीर बोहराला दिल्ली एअरपोर्टवर रोखलं, वाचा नेमकं घडलं तरी काय

टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा याला मुंबई ते नेपाळ प्रवासा दरम्यान अचानक दिल्ली एअरपोर्टवर रोखण्यात आलं.

टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा याला मुंबई ते नेपाळ प्रवासा दरम्यान अचानक दिल्ली एअरपोर्टवर रोखण्यात आलं.

टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा याला मुंबई ते नेपाळ प्रवासा दरम्यान अचानक दिल्ली एअरपोर्टवर रोखण्यात आलं.

मुंबई, 31 जानेवारी : टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा याला मुंबई ते नेपाळ प्रवासा दरम्यान अचानक दिल्ली एअरपोर्टवर रोखण्यात आलं. करणवीर एअर इंडिया कंपनीच्या विमाननं प्रवास करत होता. पण या प्रवासासाठी आवश्यक असलेले कागदपत्र नसल्यानं करणवीरला दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर थांबवण्यात आलं. याबाबत करणवीरनं ट्विटरवर एक पोस्ट करत आपला राग व्यक्त केला. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करणवीर त्याची आगामी वेबसीरिज ‘द कसिनो’च्या शूटिंगसाठी नेपाळला जात होता. करणवीर मुंबईतून दिल्लीला पोहोचला आणि तिथून त्याला काठमांडूची कनेक्टिंग फ्लाइट पकडायची होती. पण त्या ठिकाणी त्यानं योग्य कागदपत्रांची पूर्तात न केल्यानं ही फ्लाइट पकडण्यापासून रोखण्यात आलं.

लोक समजायचे अमरोहींची दत्तक मुलगी, अभिनेत्रीनं नाकारली 600 कोटींची संपत्ती

याबद्दल ट्वीट करताना करणवीरनं लिहिलं, नेपाळला जात असताना मला दिल्ली एअरपोर्टवर डिपोर्ट करण्यात आलं. फक्त आधार कार्ड घेऊन प्रवास करणं त्यांना मान्य नाही. नेपाळ सरकार रस्त्यामार्गे येणाऱ्यांना पासपोर्ट, मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड यासोबत प्रवास करण्याची परवानगी देतं मात्र विमानानं प्रवास करताना फक्त पासपोर्ट आणि मतदान ओळखपत्रानं परवानगी आहे. मग एअर इंडियानं मला मुंबईतून दिल्ली पर्यंत फक्त आधार कार्डवर प्रवास का करु दिला. त्यावेळीच त्यांनी मला का थांबवलं नाही. करणवीरनं त्याच्या या ट्वीटमध्ये भारतीय दूतावास आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनाही टॅग केलं आहे.

सनी लिओनीला क्रिकेट नाही तर 'या' खास कारणासाठी आवडतो कॅप्टनकुल धोनी

करणवीरच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर टीका केली जात आहे. विमान प्रवास करत असताना स्वतःसोबत आवश्यक कागदपत्र घेऊन जात का नाही असा प्रश्न केला आहे. तर काहींनी दुसऱ्या देशात जाताना पासपोर्ट न घेतल्यामुळे करणवीरला ट्रोल केलं आहे. यावर उत्तर देताना करणवीरनं लिहिलं, मला माहित आहे की मी पासपोर्ट सोबत ठेवायला हवा पण मग त्यासाठी मला त्यांनी मुंबई एअरपोर्टवर का थांबवलं नाही. त्यावेळी ते कोमात होते का? एखादी प्रायव्हेट कंपनी या एअरलाइनला हॅन्डल करत असती तर बरं झालं असतं.

करणवीरची आगामी वेबसीरिज ‘द कसिनो’मध्ये तो अभिनेत्री मंदाना करीमीसोबत स्क्रिन शएअर करणार आहे. ही वेबसीरिज झी 5 वर प्रसारित केली जाणार आहे.

नाईट लाईफ... ते काय असतं? सैराटफेम आर्चीचा ‘निरागस’ प्रश्न

First published:

Tags: Bollywood, Karanvir bohra