करण ओबेरॉय रेप केसमध्ये आता आली काळी जादू, प्रकरणाला नवं वळण

करण ओबेरॉय रेप केसमध्ये आता आली काळी जादू, प्रकरणाला नवं वळण

करणवर आरोप करणाऱ्या महिलेवर काही दिवसांपूर्वी हल्लाही झाला होता. यानंतर हे स्पष्ट झालं की या प्रकरणात तिच्या वकिलाचा अली काशिफ खानचाच हात होता.

  • Share this:

मुंबई, 08 जून- काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करण्यात आले. यासाठी त्याला तुरुंगातही काही दिवस राहावे लागले. शुक्रवारी त्याला जामीन मंजूर झाला. करणवर आरोप करणाऱ्या महिलेवर काही दिवसांपूर्वी हल्लाही झाला होता. यानंतर हे स्पष्ट झालं की या प्रकरणात तिच्या वकिलाचा अली काशिफ खानचाच हात होता. अलीला अटक केल्यानंतर त्या महिलेनेच त्याच्यावर काळी जादू केली आणि हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला. यानंतर महिलेने टाइम्स ऑफ इंडियाला मेसेज करत यात तथ्य नसल्याचं सांगितलं. तिने सांगितलं की ती फक्त पूजा- प्रार्थना करत होती.

या अभिनेत्याच्या लग्नाच्याच दिवशी झालं होतं वडिलांचं निधन, आता होतेय घटस्फोटाची चर्चा

मात्र, महिलेचे माजी फॉलोअर आणि तिचे रीटेलर ग्राहकने त्याचं नाव न लिहिण्याच्या अटीवर म्हटलं की, ही महिला काळी जादू करण्यात पटाईत आहे. ती नेहमीच समोरच्याला घाबरवायला आणि धमकी द्यायला या सर्व गोष्टींचा वापर करते. टाइम्स ऑफ इंडियाने शुक्रवारी महिलेशी संपर्क साधला असता तिने कोणतीही प्रतिक्रिया द्यायला स्पष्ट नकार दिला. यादरम्यान फॉलोअरने टाइम्स ऑफ इंडियाला त्या महिलेने सोशल मीडिया ग्रुपवर पाठवलेले असे अनेक मेसेज दाखवले ज्यात काळ्या जादूबद्दल सांगण्यात आले आले.

घटस्फोटाच्या एक वर्षानंतरच ज्वाला गुट्टाला डेट करतोय हा अभिनेता

दरम्यान, पीडितेने केलेले हे आरोप आताचे नसून जुने आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत पीडितेने म्हटलं होतं की, ‘मी आणि करण एका डेटिंग अपच्या माध्यमातून भेटले होते. सुरुवातीला त्याने माझ्याकडे माझे सर्वसामान्य फोटो मागितले. त्यानंतर तो माझ्याकडे माझे वस्त्रहिन फोटो मागत होता. ऑक्टोबर २०१६ मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. पहिल्या भेटीतच आम्ही एकमेकांच्या फार जवळ आलो. यानंतर आम्ही सतत भेटत राहिलो. मी करणवर पैसा खर्च करत होते. मे २०१७ मध्ये करणचं घर गहाण ठेवल्याचं त्याने मला सांगितलं. मी त्याला मदतीसाठी लाखो रुपये दिले. मी त्याला घरातलं अनेक सामान विकत घेऊन दिलं. त्यानंतर करणच्या जवळच्या व्यक्तिने तो माझा फक्त वापर करत असल्याचं सांगितलं. मी करणकडे माझे पैसे परत मागितले तेव्हा त्याने ते द्यायला नकार दिला. मी त्याला माझे जे फोटो आणि व्हिडिओ पाठवले होते ते त्याने डिलीट केले की नाही तेही मला माहीत नाही.’

जिमच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद झाला इम्रान खान, ओळखताही येणं अशक्य

करणनेही आपली बाजू मांडत म्हटलं की, सुरुवातीला मी तिच्यासोबत फ्लर्ट केलं पण तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. आम्ही कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हतो शिवाय आमच्यात सेक्सही कधी झालं नाही. मुंबईत माझी दोन घरं आहेत. त्यातलं एकही गर गहाण ठेवलेलं नाही. मी तिला सगळीकडून ब्लॉक केलं आहे. तिने मला सांगितलं होतं की तिला माझं घर सांभाळायचं आहे. तिला मी माझ्या घराचं सामान आणायलाही पैसे दिले होते. त्यामुळे तिच्याकडून पैसे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. या प्रकरणात मीच पीडित आहे.

VIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी

First published: June 8, 2019, 11:17 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading