Home /News /entertainment /

पोलीस असल्याची बतावणी करत पैसे उकळणाऱ्या अभिनेत्याच्या क्राईम ब्राँचने आवळल्या मुसक्या

पोलीस असल्याची बतावणी करत पैसे उकळणाऱ्या अभिनेत्याच्या क्राईम ब्राँचने आवळल्या मुसक्या

पोलीस असल्याची बतावणी करत सामान्य नागरिकांना लुबाडणाऱ्या एका टीव्ही कलाकाराला (TV Actor) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे.

मुंबई, 16 डिसेंबर: टीव्ही मालिकेत (TV Actor) काम करणाऱ्या एका अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्याचं नाव सलमान जाफरी (Salman Jafri) असून वय 40 आहे. हा अभिनेता पोलिसांच्या वेशात सामान्य माणासांना फसवत असे. या अभिनेत्याने छत्रपती राजा शिवाजी, सावधान इंडिया (Savdhan India) अशा काही मालिकांमध्ये काम केलं आहे. सलमान जाफरी या टीव्ही कलाकाराने उत्तराखंडमधल्या देहरादून इथे राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेला पोलीस असल्याचे सांगत तिच्याकडील 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले होते. याप्रकरणी देहरादूनच्या पटेल नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. आरोपी मुंबईतील अंधेरी ओशिवरा येथे राहत असल्याची माहिती पोलिासांना मिळाली. पटेल नगर पोलिसांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट आठला आरोपींना अटक करण्यासाठी विनंती केली होती. यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली तेव्हा त्या आरोपींपैकी एक टीव्ही कलाकार असल्याचं निष्पन्न झालं आहे. चंदीगड, उत्तराखंड येथे पोलीस बनून हा टीव्ही कलाकार लोकांची फसवणूक करत होता. सलमान जाफरीने चित्तोडगड की राजकुमारी, छत्रपती राजा शिवाजी, सावधान इंडियासारखे सिरीयल, गुलमकाई, बहन चोर सारख्या चित्रपटांमध्येसुद्धा त्याने सहकलाकार म्हणून काम केलं आहे. पोलिसांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या या आरोपीने आपला चोरीशी काही संबंध नसल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच सलमान अन्सारी पोपटासारखा बोलू लागला. सलमान चोरीसाठी विमानाने परराज्यात प्रवास करायचा. देहरादून, चंदीगड, उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी सलमान मुंबईतून विमानाने प्रवास करायचा. देहरादून, चंदीगड, उत्तर भारतातील काही राज्यात पोलीस असल्याचं सांगून नागरिकांना लुटल्यानंतर तो पुन्हा विमानाने मुंबईत यायचा. सलमान जाफरीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? हे पोलिसांनी तपासले असता त्याच्यावर नागपूरमध्ये 3, उत्तराखंड राज्यांमध्ये 2 असे गुन्हे दाखल आहेत. सलमान जाफरी आणि त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतर त्यांना डेहराडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:

Tags: Crime, Tv actor

पुढील बातम्या