Home /News /entertainment /

'बेपनाह प्यार है आ जा...'लडाखमध्ये अक्षया कोणाला घालतेय साद? अभिनेत्रीचा सुंदर VIDEO एकदा पाहाच!

'बेपनाह प्यार है आ जा...'लडाखमध्ये अक्षया कोणाला घालतेय साद? अभिनेत्रीचा सुंदर VIDEO एकदा पाहाच!

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने अंजली अर्थातच अक्षयाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे.

  मुंबई, 13 ऑक्टोबर- 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzat Jiv Rangala) मालिकेतून लोकप्रिय . झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर(Akshaya Devdhar) होय. सध्या पडद्यापासून दूर असलेली अक्षया आपल्या मैत्रिणींसोबत लडाख ट्रिपचा आनंद घेत होती. लडाखचे अनेक फोटो आणि व्हिडीओ अक्षया सतत शेअर करत आहे. नुकताच
  View this post on Instagram

  A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

  अभिनेत्री अक्षया देवधर सध्या कोणत्याही मालिकेमध्ये दिसून येत नाहीय. मात्र ती आपला हा वेळ आपल्या मैत्रिणींसोबत घालवत आहे. अक्षया नुकताच आपल्या मैत्रिणींसोबत लेह-लडाखच्या सुंदर ट्रिपवर गेली होती. ट्रिप दरम्यान अक्षयाने अनेक अप्रतिम फोटो आणि रील्स काढले आहेत. ती सतत आपल्या सोशल मीडियावर या आठवणी शेअर करत आहे. नुकताच अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लडाखमधील आपला एक रील शेअर केला आहे. 'कृष्णा कॉटेज' या बॉलिवूड चित्रपटातील 'बेपनाह प्यार है' या सुप्रसिद्ध गाण्यावर हा रील बनवला आहे. हे गाणं आणि व्हिडीओमध्ये असलेलं वातावरण अगदी समांतर वाटत आहे. त्यामुळे अक्षयाचा हा व्हिडीओ पाहून युजर्सना सोहेल खान आणि ईशा कोप्पीकरचं ते ओरिजनल गाणं डोळ्यांसमोर येत आहे. (हे वाचा:अक्षया देवधरचं लडाखमध्ये 'परमसुंदरी'; गर्ल गॅंगचा धम्माल VIDEO झाला ... ) अक्षयाने हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे. चाहत्यांना व्हिडीओ फारच पसंत पडत आहे. अक्षया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत असते. अभिनेत्रीने नुकताच आपल्या मैत्रिणींसोबत लेह लडाखची ट्रिप केली आहे. ती सतत सोशल मीडियावरून आपल्या ट्रीपच्या अपडेट्स चाहत्यांना देत होती. त्यामुळे तिच्या या ट्रीपची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वीच तिने लडाखमधील प्रसिद्ध तलावावर आपल्या गर्ल गॅंगसोबत साडीवर जबरदस्त रील बनवला होता. त्यालाही चाहत्यांची पसंती मिळाली होती. (हे वाचा:VIDEO: 'मला म्हणत्यात हो पुण्याची मैना' 'अंजली' फेम अक्षयाचा पुणेरी ... ) 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने अंजली अर्थातच अक्षयाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. काही महिन्यांपूर्वी मालिकेने आपला निरोप घेतला आहे. तरी अजूनही लोक या मालिकेची आठवण काढतात. लोकांना आजही राणा-अंजलीची जोडी प्रचंड आवडते. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या अक्षयाने कोल्हापूरच्या रांगड्या मातीत या मालिकेचं शूटिंग केलं होतं. हि मालिका कोल्हापूरच्या एका खेडेगावावर आधारित असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर अक्षया अजूनही कोणत्याच मालिकेत पुनरागमन केलेलं नाहीय. ती आपला हा मोकळा वेळ आपल्या जवळच्या लोकांसोबत एन्जॉय करताना दिसून येत आहे. मात्र अक्षयाच्या चाहत्यांना तिच्या पुनरागमनाची उत्सुकता लागून राहिली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या