Home /News /entertainment /

‘जर अभिनेत्री नसते तर...’ प्रार्थनाने सांगितलं आपल्या करिअरचं गुपित

‘जर अभिनेत्री नसते तर...’ प्रार्थनाने सांगितलं आपल्या करिअरचं गुपित

प्रार्थना बेहरे सध्या ‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेत झळकत आहे.

  मुंबई, 8 सप्टेंबर- ‘तुझी माझी रेशीमगाठ’(Tuzi Mazi Reshimgath) मालिकेतील नेहा अर्थातच अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthna Behare) आपल्या सर्वांचंचं मन जिंकत आहे. नेहा, परी आणि यश या त्रिकुटाने मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. आपल्या अभिनयाने सर्वांना आपलसं करणाऱ्या प्रार्थनाला नुकताच विचारण्यात आलं होतं, ‘तू जर अभिनेत्री नसतीस तर कोणत्या क्षेत्रात असतीस?’ यावर अभिनेत्रीने दिलेलं उत्तर खूपच खास होतं.
  View this post on Instagram

  A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

  नुकताच झी 5ने प्रार्थनाची एक छोटीशी मुलाखत घेतली होती. दरम्यान प्रार्थनाबद्दल आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टींबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. या उत्तरांमधून चाहत्यांना प्रार्थनाची अनेक गुपित समजली आहेत. यावेळी प्रार्थनाला विचारण्यात आलं होतं. ‘तू जर अभिनेत्री नसतीस, तर कोणत्या क्षेत्रात असतीस?’ यावर उत्तर देत प्रार्थनाने म्हटलं ‘मी अभिनेत्री नसते तर, एक जर्नलिस्ट असते. कारण मला एकापाठोपाठ एक प्रश्न विचारायला खूप आवडतात.’ अर्थातच प्रार्थनाला पत्रकारीतेची आवड आहे. तसेच या दोन्ही गोष्टीं व्यतिरिक्त प्रार्थनाला पेंटिंगचीसुद्धा आवड आहे. त्यामुळे ती पेंटरही होऊ शकली असती असं तिनं स्वतः म्हटलं आहे. (हे वाचा: VIDEO: गौरी-जयदीपला बाप्पाच्या आगमनाची ओढ; होणार जंगी स्वागत) प्रार्थनाने जाहिरातींमधून आपल्या करीयरची सुरुवात केली होती. त्यांनतर ती प्रसिद्ध हिंदी मालिका ‘पवित्र रिश्ता’मध्ये अर्चनाच्या म्हणजेच अंकिता लोखंडेच्या लहान बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. त्यांनतर तिने आपला मोर्चा मराठी चित्रपटांकडे वळवला होता. आणि पाहता पाहता तिने चांगलं यशसुद्धा मिळवलं आहे. (हे वाचा:मृण्मयी देशपांडेचा स्वॅग; 'मुंबई डायरीज'मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला) सध्या प्रार्थना ‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेत झळकत आहे. मालिकेमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. या मालिकेमध्ये प्रार्थनासोबत मराठीतील उत्कृष्ट अभिनेता श्रेयश तळपदे मुख्य भूमिकेत आहे. आणि सर्वांचं लक्ष वेधलं आहे, ते मालिकेत प्रार्थनाच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या छोट्याश्या परीने अर्थातच मायराने. नुकताच सुरु झालेली ही मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या