Home /News /entertainment /

श्रेयस तळपदेच्या रिअल लाईफ परीला पाहिलंय का?आहे खूपच क्युट

श्रेयस तळपदेच्या रिअल लाईफ परीला पाहिलंय का?आहे खूपच क्युट

मराठमोळा बॉलिवूड अभिनेता आणि सध्या 'तुझी माझी रेशीमगाठ' (Tuzi Mazi Reshimgath) या मराठी मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) होय.

  मुंबई, 4 नोव्हेंबर-  मराठमोळा बॉलिवूड अभिनेता आणि सध्या 'तुझी माझी रेशीमगाठ'  (Tuzi Mazi Reshimgath) या मराठी मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे   (Shreyas Talpade)  होय. श्रेयसनं अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधून चाहत्यांचं प्रेम मिळवलं आहे. श्रेयसचा एक खास चाहतावर्ग आहे. अनेक वर्षानंतर श्रेयसने 'तुझी माझी रेशिमगाठ' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्यामुळे त्याचे खुश आहेत. या अभिनेत्याबद्दल जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. अनेकांना त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायची फारच उत्सुकता आहे. त्यामुळेच आज आपण श्रेयसच्या मुलीबद्द्दल जाणून घेणार आहोत.
  अभिनेता श्रेयस तळपदेनं अनेक चित्रपटांतुन आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. विनोदी, गंभीर किंवा रोमँटिक प्रत्येक भूमिकेत श्रेयसला पसंत करण्यात आलं आहे. श्रेयसनं मराठीतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. तर 'इकबाल' चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनतर या अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. मध्यंतरी श्रेयस पडद्यापासून लांब होता. मात्र आता तो पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. विशेष म्हणजे तब्बल १७ वर्षानंतर श्रेयसने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. 'तुझी माझी रेशिमगाठ' ही त्याची मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुक होतं आहे.
  या मालिकेत यश आणि नेहाच्या केमेस्ट्री पेक्षाही नेहाची मुलगी असणाऱ्या परी आणि यशची केमेस्ट्री लोकांना जास्त भावत आहे. या चिमुकलीसोबत यशचं खूप छान बॉन्डिंग दाखवण्यात आलं आहे. हे बॉन्डिंग पाहून चाहत्यांना त्याच्या रिअल लाईफ परीला पाहण्याची उत्सुकता लागली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर यश अर्थातच श्रेयसच्या खऱ्या आयुष्यातील परीचे म्हणजेच त्याच्या मुलीचे फोटो पाहिलेही असतील. मात्र ज्यांनी पाहिलं नाही यांच्यासाठी आज खास आम्ही श्रेयसच्या मुलीचे फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
  श्रेयस तळपदेला एक गोंडस अशी लेक आहे. या लेकीचं नाव आद्या असं आहे. आद्यासुद्धा परी इतकीच सुंदर आणि गोड आहे. ती सतत आपल्या बाबासोबत मजामस्ती करत असते. श्रेयस अनेकवेळा सोशल मीडियावर आद्यासोबतचे फोटो शेअर करत असतो. आद्या आणि श्रेयसमध्ये खूपच छान बॉन्डिंग आहे. श्रेयसने दीप्तीसोबत लग्न केलं आहे. दीप्ती तळपदे ही एक सायकॅट्रिक आहे.या दोघांची लव्हस्टोरीसुद्धा फारच इंटरेस्टिंग आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या