Home /News /entertainment /

'तुझ्यात जीव रंगला' फेम राणा दिसणार नव्या भूमिकेत; या मालिकेत झळकणार हार्दिक जोशी

'तुझ्यात जीव रंगला' फेम राणा दिसणार नव्या भूमिकेत; या मालिकेत झळकणार हार्दिक जोशी

अभिनेता हार्दिक जोशीला (Hardik Joshi) प्रेक्षकवर्ग फारच मिस करत आहे. पण हार्दिकच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

  मुंबई 7 ऑगस्ट :  राणादा या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता हार्दिक जोशीला (Hardik Joshi) प्रेक्षकवर्ग फारच मिस करत आहे. झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील प्रचंड लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला मध्ये’ (Tuzhyat Jeev Rangala) तो दिसला होता. त्यातील राणा या पात्रने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) सोबत त्याची केमिस्ट्री हीट ठरली होती. तब्बल 4 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण हार्दिक च्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता हार्दिक पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. झी मराठी वाहिनीवर सध्या अनेक नव्या मालिकांचे प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. जुन्या मालिका जाऊन आता नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tuzhya Mazhya Sansarala Ani Kai Hawa) या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. यात अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) दिसत आहे.

  ग्लॅमरस साडीत प्राजक्ता माळीचं खुललं सौंदर्य; 'परम सुंदरी' म्हणत चाहते घायाळ

  अद्याप मालिकेतील मुख्य नायिका दाखवण्यात आली मात्र नायक दिसला नाही. यातील नायक दुसरा तिसरा कोणीही नसून अभिनेता हार्दिक जोशीच आहे. त्यामुळे हार्दिकच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ही नवी मालिका 30 ऑगस्ट पासून रसिकांच्या भेटीला येत आहे.
  दरम्यान हार्दिकला प्रेक्षकांनी गावरान राणाच्या भूमिकेत पाहिलं आहे. तेव्हा आता या मालिकेत तो कोणत्या रूपात दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. तर मालिकेतील प्रोमोत अमृता पवार ही दिसत असून ती सासरी जाण्याची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी अमृता सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिगरबाज’ या मालिकेत दिसली होती.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या