"स्टारकिडसाठी मला फिल्ममधून काढलं," 'तुंबाड'च्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकार बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत (bollywood nepotism) व्यक्त होऊ लागले आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवरून वाद सुरू झाला. अभिनेत्री कंगणा रणौतसह अनेक सेलिब्रिटी यावर व्यक्त झालेत. आता तुंबाड (Tumbbad) फेम अभिनेत्री रोंजिनी चक्रवर्तीदेखील (ronjini chakraborty) याबाबत आपला अनुभव मांडला आहे.

अभिनेत्री रोंजिनी चक्रवर्तीने 'तुंबाड', 'सिम्बा', 'आर्टिकल 15' यासारख्या फिल्ममध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तिलादेखील घराणेशाहीचा सामना करावा लागला होता. स्टारकिडला चित्रपटात घेण्यासाठी आपल्याला काढून टाकण्यात आलं होतं, असा धक्कादायक खुलासा रोंजिनीने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

रोंजिनी म्हणाली, "असं अनेकदा घडतं. एका स्टारकिडसाठी मलाही चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. त्यांना एक प्रसिद्ध, ओळखीचा चेहरा हवा होता. प्रत्येक क्षेत्रात असं होतं आणि या इंडस्ट्रीत तर सर्वात जास्त होतं, असं मला वाटतं. तुम्हाला इथंच राहायचं असेल तर भरपूर मेहनत करूनच तुम्हाला पुढे जायला हवं. नाहीतर या इंडस्ट्रीशी संबंधित नाही अशा कलेकडे आपल्याला वळावं लागेल जसं की थिएटर आर्टिस्ट"

हे वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती आला महत्त्वाचा फॉरेन्सिक रिपोर्ट

"मात्र याबाबत मी नकारात्मकता न ठेवता प्रेक्षक हा खरा स्टार आहे असं मी मानते. मला माझ्या अभिनयाने प्रेक्षकांशी जोडण्याची गरज आहे. माझा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकांनी त्यांचे 500 रुपये खर्च करण्याची तयारी असावी, मला इतक्या ताकदीची अभिनेत्री व्हावं लागेल", असं रोंजिनी म्हणाली.

हे वाचा - फेसबुकवर VIDEO पोस्ट करत अभिनेत्रीनं केला आत्महत्येचा प्रयत्न

रोंजिनीने 2012 साली 'सिडनी विथ लव्ह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तुंबाड' या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. तिने 'सिम्बा' आणि 'आर्टिकल 15' या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय 'रक्तांचल' आणि 'लाल बाजार' या वेब सीरिजमधल्या तिच्या अभिनयानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. रोंजिनी लवकरच 'रक्तांचल'च्या दुसऱ्या सिझनमध्ये झळकणार आहे.

Published by: Priya Lad
First published: July 27, 2020, 3:18 PM IST

ताज्या बातम्या