News18 Lokmat

'तुंबाड' या हाॅरर सिनेमात राधिकाचा मेकओव्हर

तुंबाड सिनेमा रिलीज झाला. राही अनिल बर्वेनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा भयपट आहे. प्रेक्षकांना अक्षरश: खुर्चीला खिळवून ठेवतो.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2018 09:49 AM IST

'तुंबाड' या हाॅरर सिनेमात राधिकाचा मेकओव्हर

मुंबई, 13 आॅक्टोबर : तुंबाड सिनेमा रिलीज झाला. राही अनिल बर्वेनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा भयपट आहे. प्रेक्षकांना अक्षरश: खुर्चीला खिळवून ठेवतो. या सिनेमात राधिकाफेम अनिता दाते-केळकरची महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या भूमिकेबद्दल अनितानं न्यूज18लोकमतशी बातचीत केली.

अनिता दाते-केळकर सांगते, ' मी 2011मध्ये अनुराग कश्यप यांच्या आॅफिसमध्ये अय्या सिनेमाची आॅडिशन द्यायला गेले होते. तेव्हा मी तिथे तुंबाड सिनेमाचं पोस्टर पाहिलं. पोस्टर बघूनच तो सिनेमा भारी असेल, असं वाटत होतं. अनुराग कश्यप तो सिनेमा प्रेझेंट करणार होता. त्यावेळी माझ्या मनात आलं की या सिनेमात मला काम करायला मिळालं तर किती बरं होईल.' आणि खरोखरच अनिताच्या मनातली इच्छा पूर्ण झाली.

अनिताला आॅडिशनला बोलावलं. त्याचवेळी तिनं तुंबाडचं अख्खं तयार असलेलं स्क्रीप्ट पाहिलं होतं. अनिता या भयपटाबद्दल सांगते, ' मी स्वत: हाॅरर सिनेमा पाहताना घाबरते. अगदी महत्त्वाच्या क्षणी डोळे मिटून घेते.मला भीती खूप वाटते. भय ही माणसाची भावना आहे. ती अनेक प्रकारे बाहेर आली पाहिजे, तुंबाडमधून ती येते.' अनिता सांगत होती.

तुंबाडमध्ये अनिता मराठमोळी दिसते. तिचं हिंदीही मराठीमिश्रित आहे.  याबद्दल ती म्हणाली, 'सिनेमातलं वातावरण मराठमोळं आहे. त्यामुळे आम्ही वेळोवेळी इम्प्रोव्हायझेशन करत होतो.'

हा सिनेमा फक्त भयपट नाही. तो भाषेपलिकडचा सिनेमा आहे. यातले व्हिज्युअल इफेक्ट्स अप्रतिम आहेत. सिनेमाच्या शूटिंगबद्दल अनिता सांगते, ' 2013मध्ये सिनेमा शूट झाला, डबही झाला. नंतर आम्ही तो पुन्हा रिव्हिजिट केला. 2015मध्ये आम्ही या सिनेमाच्या काही सीन्सचं शूटिंग केलं. डबिंगही पुन्हा केला. आता जो सिनेमा दिसतोय, त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आता दिसतो तो सिनेमा.'

Loading...

पुन्हा डबिंग करतानाही बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. अनिता म्हणाली, ' छोटी मुलं मोठी झाली, त्यांचे आवाजही बदलले. एवढंच कशाला माझाही आवाज बदलला. तो पुन्हा क्रिएट करणं हे मोठं आव्हान होतं.'

अनिता आता लोकप्रिय आहे ती राधिका म्हणून. प्रेक्षक सुलक्षणाला बघताना त्यांना राधिकाही आठवेलच. याबद्दल अनिता सांगते, ' राधिका सुभेदार ही नक्की वेगळी आहे. पण प्रेक्षक बाहेर पडताना त्यांना राधिका आणि सुलक्षणा यांच्यात काहीसं साम्य आढळेल, हे नक्की.'

अनिता म्हणते, ' हा सिनेमा नुसता भयपट नाही. ही आपल्या मातीतली असली, तरी ती जगामधलं सत्य आहे. ही गोष्ट लालची माणसाची आहे. सर्व प्रकारच्या भुकेची आहे. हा चित्रपट पाहून तुम्हाला भीती नक्की वाटेल, ही भीती स्वत:ची आणि इतरांची असेल.'

शेवटी अनिताला @Metoo चळवळीबद्दलही विचारलं. ती म्हणाली, ' हे स्त्रीबद्दल घडत असेल तर ते वाईटच आहे. मग ती कुणीही करेना. त्याचं समर्थन होऊच शकत नाही.'

रोज राधिका म्हणून भेटणारी अनिता तुंबाडमध्ये वेगळ्या रूपात दिसणार आहे. या भयपटाबद्दल नक्कीच उत्सुकता वाढलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2018 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...