विक्रांत सरंजामे घेतोय 'जब वुई मेट'ची मदत

विक्रांत सरंजामे घेतोय 'जब वुई मेट'ची मदत

'तुला पाहते रे' मालिका लोकप्रिय होण्यामागे आणखी एक कारणही आहे. या मालिकेतल्या बऱ्याच घटना लोकप्रिय सिनेमावरच बेतल्यात.

  • Share this:

मुंबई, 26 आॅक्टोबर :  विक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम कधी व्यक्त करणार? हा प्रश्न हल्ली तमाम मराठी मालिकांच्या रसिकांना पडलाय. विक्रांतनेच ईशाला प्रमोशन देऊन बंगलोरला पाठवायचं ठरवलं आणि आता त्यानंच बस थांबवून ईशाला जाण्यापासून थांबवलं. 'तुला पाहते रे' मालिका लोकप्रिय होण्यामागे आणखी एक कारणही आहे. या मालिकेतल्या बऱ्याच घटना लोकप्रिय सिनेमावरच बेतल्यात.

आता विक्रांत ईशाच्या घरी राहायला आला होता. तेव्हा एव्हरग्रीन सिनेमा दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगेचीच प्रेक्षकांना आठवण आली. ईशाच्या लग्नात तो काम करतो, तिच्या आईवडिलांची मर्जी संपादन करतो आणि तिचं लग्नही मोडतो. डीडीएलजे सिनेमातल्या शाहरुखची आठवण आली की नाही?

आता या मालिकेनं आधार घेतलाय जब वुई मेट सिनेमाचा. या सिनेमातही शाहीद कपूर आणि करिना असेच एकमेकांच्या प्रेमात पडले. पण शाहीद काही आपलं प्रेम व्यक्त करत नाहीय. तसंच इथेही आहे. सुबोध भावे आपलं ईशावरचं प्रेम व्यक्त करत नाहीय. त्याला ते जाणवतंय, पण वयातलं अंतर त्याला तोंड उघडू देत नाहीय. त्यामुळे ईशाही रागावलीय.

ईशा विक्रांतला विचारते, 'तुम्ही प्रेम का मान्य करत नाहीत?' यावर विक्रांतचं उत्तर असं की मला जे वाटतं ती आपुलकी आहे. या मनाच्या कल्लोळातून बाहेर पडण्यासाठी विक्रांत ईशाला त्याच्या जवळच्या सहकाऱ्याच्या सांगण्यावरून प्रमोशन देतो. तो ईशाला बंगलोरला पाठवायचा निर्णय घेतो. ईशाला त्याचा या मागचा हेतूही कळतो.

'तुला पाहते रे' मालिका अशा वेगवेगळ्या प्रसंगांना विविध सिनेमांचा आधार घेणार असं दिसतंय. प्रेक्षकही दोन घटका वास्तवापेक्षा वेगळं जग एंजाॅय करतो आणि स्वत:चा स्ट्रेस कमी करतो.

Loading...

आमिर खान,जया बच्चन यांच्या उपस्थितीत 'मामि'चं जंगी उद्घाटन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2018 02:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...