राजने आपल्या अकाऊंटवर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये, तो एका सुंदर सहा नदीकिनारी उभा असलेला दिसत आहे. त्याचवेळी मुख्य अभिनेत्री तिला भेटायला येते. आणि या दोघांमध्ये मजेशीर पण प्रेमळ संवाद ऐकायला मिळत आहे. या प्रोमोवरून एक गोष्ट लक्षात येत आहे की, मालिकेत मराठीसोबत साऊथचा तडक पाहायला मिळणार आहे. कारण अभिनेत्री काही प्रमाणात कन्नडमध्ये बोलताना दिसून येत आहे. या मालिकेत राजसोबत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रतीक्षने याआधी एका लग्नाची पुढची गोष्ट, कॉलेज डायरी,कॉमेडी बिमेडी अशा प्रोजेक्टसमध्ये काम केलं आहे. (हे वाचा: '...आणि मग पहिला रेडिओ घरात आणला '' केदार शिंदेंनी सांगितला शाहिरांच्या पत्नीच्या हट्टाचा तो किस्सा) राज हंचनाळेबाबत सांगायचं तर 'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतून राज घराघरात पोहोचला होता. या मालिकेत राजने राणा म्हणजेच हार्दिक जोशीच्या भावाची आणि धनश्री काडगावकरच्या पतीची भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. शिवाय या मालिकेमुळे राजला एक नवी ओळख मिळाली होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.