News18 Lokmat

गावकऱ्यांचा जीव उबगला, 'तुझ्यात जीव रंगला'चं शुटिंग केलं बंद

कलानगरीत "तुझ्यात जीव रंगला" या मालिकेचं चित्रीकरण गेल्या वर्षभरापासून सुरू आहे पण आता याच चित्रीकरणात वाद निर्माण झालाय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2017 09:59 PM IST

गावकऱ्यांचा जीव उबगला, 'तुझ्यात जीव रंगला'चं शुटिंग केलं बंद

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

30 आॅक्टोबर : कोल्हापूर म्हणजे कलानगरी आणि याच कलानगरीत "तुझ्यात जीव रंगला" या मालिकेचं चित्रीकरण गेल्या वर्षभरापासून सुरू आहे पण आता याच चित्रीकरणात वाद निर्माण झालाय. काय आहे हा वाद याबद्दलचा हा एक स्पेशल रिपोर्ट...

कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील हे वसगडे गाव...गाव तसं लहानच..पण 'झी मराठी' वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेचं शुटिंग याच गावात करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आणि हे गाव अल्पावधीतच महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. या मालिकेतील 'राणा' आणि 'पाठकबाई' हे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. प्रेक्षकांनीही या मालिकेला प्रतिसाद दिला. तर या मालिकेचं चित्रीकरण सुरू असणाऱ्या वसगडे गावातल्या 70 ते 80 कुटुंबियांनाही या चित्रीकरणामुळे आर्थिक हातभार लागला. अनेक स्थानिक कलाकारांनाही वाव मिळाला याच मालिकेमध्ये...पण आता या मालिकेच्या चित्रिकरणामुळे गावकऱ्यांनी तक्रार केली. त्यामुळं गावातील चित्रीकरण सध्या बंद असून सध्या दुसऱ्या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे.

या सगळ्या वादात आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे.

वसगडे गावातील ज्या भागांमध्ये या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे त्या भागातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे, त्यांना काय त्रास होतो या चित्रीकरणाचा याचा पाढाच गावकऱ्यांनी ग्रामपंचायती समोर वाचलाय पण आता ग्रामपंचायत ही याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ असं म्हटलंय.

Loading...

वसगडे गाव याच मालिकेमुळे पिपली लाईव्ह बनलं, आणि आता त्याच गावात जो हा वाद निर्माण झालाय त्याला स्थानिक राजकारणाचा वास आहे याचीही चर्चा सध्या वसगडे परिसरात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 09:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...