राणादा आणि पाठकबाईंचा टीआरपी मीटर पडला; 2 आठवड्यात घेणार प्रेक्षकांचा निरोप

राणादा आणि पाठकबाईंचा टीआरपी मीटर पडला; 2 आठवड्यात घेणार प्रेक्षकांचा निरोप

'तुझ्यात जीव रंगला' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? संध्याकाळी 7.30 सुरू होणार ही नवी मालिका.

  • Share this:

मुंबई, 4 ऑक्टोबर: घराघरात स्त्रियांच्या मनात घर केलेली तुझ्यात जीव रंगला ही मालिका लवकरच प्रक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून राणाचा बदलेला लूक आणि एकूणच सिरियलमधील घडत असलेल्या घडामोडींमुळे सध्या तुझ्यात जीव रंगली ही मालिका मागच्या आठवड्यात टीआरपी मीटरवर पहिल्या नंबरवर होती. सध्या झी मराठीवर लग्नाची वाईफ वेडींगची बायकू या मालिकेचे प्रोमो चालू झाले आहेत. ही मालिका 21 ऑक्टोबरपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे तुझ्यात जीव रंगला मालिका बंद होणार आहे.

प्रेमळ आणि लाघवी स्वभावाच्या पाठकबाई आणि राणा यांच्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनात घरं केलं आहे. आता राणाचं राजगोंडा रुप हे अक्षरश: प्रेक्षकांची डोक्यावर घेतलं. त्यामुळे मालिका टीआरपी मीटरमध्येही पहिल्या नंबरवर आहे. मात्र हे दोघेही आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यानं काहीशी नाराजीही आहे. पाठकबाई आणि राणा पुन्हा एकत्र येण्यासाठी धडपड करत आहेत तर नंदिता आणि तिच्या भावाला त्यांच्या चुकीची शिक्षा देण्यासाठी राणाचे प्रयत्न सुरू आहेत. ही मालिका 3 ऑक्टोबर 2016 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठीवर सुरू झाली असून 20 ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याचं कारण म्हणजे 7.30 वाजता सुरू होणारी नवी मालिका याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी नव्या सिरियलचे प्रोमो झी मराठीवर सुरू झाले आहेत.काही दिवसांपासून माझ्या नवऱ्याची बायको बंद करावी असा नेटकऱ्यांनी सल्ला दिला आहे. तुझ्यात जीव रंगलापेक्षा माझ्या नवऱ्याची बायको मालिका पाणी ओतून उगाच ओढून ताणून दाखवली जात आहे. रटाळ मालिका दाखवण्यापेक्षा ती बंद करा असा संताप सोशल मीडियावर नेटकरी व्यक्त करत आहेत. मधल्या काळात ही मालिका बंद होणार का अशी चर्चाही होती. मात्र आता तुझ्यात जीव रंगला मालिका बंद होते की त्याची वेळ बदलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

21 ऑक्टोबरपासून लग्नाची वाईफ वेडींगची बायकू ही नवी कोरी मालिका नव्या विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला रोज संध्याकाळी 7.30 वाजता येणार आहे. या मालिकेचं हेडिंग मजेशीर आहे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषा आणि दोन ट्रेन्ड्सची सरमिसळ असणारी ही मालिका नेमकं काय घेऊन येते हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सिरियलच्या प्रोमोमध्ये परदेशात नोकरीनिमित्त गेलेला मालिकेचा नायक पुन्हा आपल्या मायदेशी घरी येतो तेव्हा प्रत्येकासाठी एक छान भेटवस्तू घेऊन येतो. यावेळी त्याची आई विचारते तुझ्यासाठी काय आणलं. मालिकेचा नायक म्हणतो डॉल आणि तेवढ्यात एका सुंदर परदेशी तरुणीची घरात एन्ट्री होते आणि सगळे थक्क होतात. प्रोमो संपल्यावर ही मालिका 21 ऑक्टोबरपासून 7.30 वाजता प्रक्षेपित होणार असल्याचं सांगितलं आहे. देशी लग्नाचा विदेशी गुताडा प्रेक्षकांना किती आवडतो आणि अंजली आणि राणा खरंच प्रेक्षकांचा निरोप घेणार का हे दोन्ही पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: October 4, 2019, 11:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading