मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

dhanashri kadgaonkar: वहिनीसाहेबांना नक्की कोणाचा रंग लागला?, पाहा धनश्रीचा VIDEO

dhanashri kadgaonkar: वहिनीसाहेबांना नक्की कोणाचा रंग लागला?, पाहा धनश्रीचा VIDEO

Dhanashri Kadgaonkar

Dhanashri Kadgaonkar

वहिनीसाहेबांनी म्हणजेच धनश्री काडगावरकरनं सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओवर सध्या अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

  मुंबई, 18 ऑगस्ट : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील वहिनीसाहेब या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर(dhanashri kadgaonkar). धनश्रीनं आपल्या कनखर आवाजानं आणि दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. धनश्रीच्या वहिनीसाहेबांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं की आता धनश्रीची ओळखच वहिनीसाहेब बनली आहे. तिला धनश्रीपेक्षा जास्त वहिनीसाहेब म्हणूनच ओळखलं जातं. अशातच वहिनीसाहेबांनी म्हणजेच धनश्री काडगावरकरनं सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओवर सध्या अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. धनश्री काडगावकरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं पारंपारिक पोषाख परिधान केला आहे. या व्हिडीओला धनश्रीनं 'असा कसा बाई मला तुझा रंग लागला' हे गाणं लावलं आहे. शिवाय व्हिडीओला कॅप्शनमध्येही 'रंग लागला' लिहिलं आहे. तिच्या व्हिडीओवर सध्या चाहत्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत.
  'कोणाचा रंग लागला, वाह क्या बात है, अप्रतिम, किती गोड ताई आणि गोड हसू, साडीमध्ये छान दिसतेय', अशा अनेक प्रकारच्या कमेंट धनश्रीच्या व्हिडीओवर येताना दिसतायेत. शिवाय व्हिडीओवर लाईक्सचाही भडिमार होत आहे. धनश्री असे अमेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेक मजेशीर रीलही ती चाहत्यांच्या मनोरंजनासाठी शेअर करते. हेही वाचा -  'जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल'; Rupali Bhosale चा भक्तीमय व्हिडीओ जिंकतोय चाहत्यांचं मन दरम्यान, धनश्री सध्या झी मराठी वरील 'तू चाल पुढं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतही ती खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. त्यामुळे चाहतेही धनश्रीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सूक होते. अखेर खूप वर्षांनंतर तिनं या मालिकेतून पुनरागमन केलं आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Instagram, Marathi actress, Zee marathi serial

  पुढील बातम्या