Home /News /entertainment /

'तुझ्या रुपाचं चांदणं' मालिकेतील कला-दत्ताला एका डायलॉगसाठी द्यावे लागतात इतके टेक-रिटेक, पाहा धमाल Video

'तुझ्या रुपाचं चांदणं' मालिकेतील कला-दत्ताला एका डायलॉगसाठी द्यावे लागतात इतके टेक-रिटेक, पाहा धमाल Video

कर्लस मराठीवर (Colors Marthi) 'तुझ्या रुपाचं चांदणं ' (Tujhya Rupacha Chandana) ही नवीन मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील पडद्यामागचा एक धमाल व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

  मुंबई, 15 जानेवारी- कर्लस मराठीवर (Colors Marthi) 'तुझ्या रुपाचं चांदणं ' (Tujhya Rupacha Chandana) ही नवीन मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'गरीबाघरी सौंदर्य हा शाप आहे', अशी या मालिकेची टॅग लाईन आहे. तुझ्या रुपाचं चांदणं या मालिकेची (tujhya rupacha chandana latest episode)कथा नक्षत्रा अर्थात नक्षी हिच्या भोवती फिरतांना दिसते.या मालिकेत नक्षीची भूमिका अभिनेत्री तन्वी शेवाळे साकारत आहे. तर या मालिकेत दत्त आणि कला यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्यात लोकप्रिय झाल्या आहेत. दत्ता आणि कलाचा कोल्हापूरी ठसका या मालिकेत पाहण्यास मिळतो.  यासाठी त्यांना किती टेक आणि रिटेक द्यावे लागतात याचा एक धमाल व्हिडिओ समोर आला आहे. प्रेक्षकांकडून देखील या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे. कर्लस मराठीने 'तुझ्या रुपाचं चांदणं' या मालिकेतीचा एक बॅक स्टेजचा व्हिडिओ शेअर केला आहे.व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, कला आणि दत्ताची कॅमेरामागील टेक-रिटेकची धमाल! विशेष म्हणजे या मालिकेत दत्ता आणि कलाचा गावरान ठसका प्रेक्षकांना खूप भावतो आहे. या मालिकेत दत्ताच्या भूमिकेत रोहित निकम दिसत आहे. कला आणि दत्ता यांना या भूमिका साकारतान किती रिटेक द्यावे लागतात याची गंमत कर्लस वाहिनीने शेअर केली आहे. त्यांच्या या डायलॉगलरील मेहनतीमुळे प्रत्येक सीन तयार होत असतो आणि प्रेक्षकांकडून पसंती मिळत असते.
  सध्या ही मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. या मालिकेत नक्षीचं सत्य कला आणि दत्तासमोर लवकर येण्याची शक्यता आहे. दत्ताला नक्षीचं सत्य समजल्यानंतर तो काय करणार याची देखील सर्वांना उत्सुकता लागली आहे. यासोबतच नुकतीच या मालिकेत दत्ताच्या आईची म्हणजे सुरेखी कुडची यांची एंट्री झाली आहे. त्यांची देखील भूमिका प्रेक्षकांना आवडू लागली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Colors marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या