मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं : अदिती- सिद्धार्थच्या आयुष्यात आलेली ही नवीन व्यक्ती कोण ?

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं : अदिती- सिद्धार्थच्या आयुष्यात आलेली ही नवीन व्यक्ती कोण ?

झी मराठीवर हार्दिक जोशी(Hardik Joshi) आणि अमृता पवार(Amruta Pawar) यांची ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’(Tujhya Majhya Sansarala Aani Kay Hava) ही मालिका सुरु झाली आहे. आता मालिकेत लवकरच एक नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 नोव्हेंबर- झी मराठीवर हार्दिक जोशी(Hardik Joshi) आणि अमृता पवार(Amruta Pawar) यांची ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’(Tujhya Majhya Sansarala Aani Kay Hava) ही मालिका सुरु झाली आहे. ही मालिका कमी काळात लोकांची आवडती मालिका बनली आहे. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. या मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि एकंदरतीच देशमुख कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलच नाही तर त्यांच्याकडील पशू-पक्षांबद्दल देखील असलेली आत्मीयता प्रेक्षकांना भावलीय. सिद्धार्थ आणि अदितीसोबत घरातील प्रत्येक व्यक्ती ही प्रेक्षकांना आपली आणि कुटुंबातील एक वाटते. आता मालिकेत लवकरच एक नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

झी मराठीने एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये सिद्धार्थ आणि अदितीचा साखरपुडा होताना म्हणजे रिंग सेरेमनी होताना दिसत आहे. यावेळी अचानक एका व्यक्तीची बायकवरून एंट्री होते व या दोघांच्या हातातील रिंग त्याच्या पायजवळ पडतात. हा व्यक्ती नेमका कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. नेटकऱ्यांना मात्र हा ट्विस्ट रूचलेला नाही. त्यांनी यावरून मालिकेला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

वाचा : 'रात्रीस खेळ चाले 3' ची उत्सुकता वाढणार! मालिकेत होणार 'वच्छी'ची एन्ट्री

एकानं नेटकऱ्याने म्हटलं आहे की, काय काम नाही वाटत झी मराठीच्या मालिका बनवणाऱ्यांना ,दोघात तिसरा आणयचा त्याशिवाय मालिकाच होत नाहीत... तर दुसऱ्याने म्हटलंय की, वाटले एकत्र कुटुंब पद्धतीचा विषय घेऊन झी मराठी काय तरी चांगलं दाखवते....पण कसले काय आता असली लफडी सुरू करून मूळ विषय बाजूलाच ठेवणार आणि लोकांना येड बनवत बसणार. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, अदिती सीड च्या आयुष्यात "आणी काय हवं..." लोकांना बघायला "आणी काय हवं..." लव ट्रायंगल सोडून लेखकाला "आणी काय हवं..." तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, बकवास .. एकदम बकवास... सिरियल गेली..अशा अनेक कमेंट या प्रोमो व्हिडीओला आल्या आहेत. तर काहींनी हा नवा व्यक्ती आदितीचा ex बॉसफ्रेंड असणार असा अंदाज देखील व्यक्त केला आहे.

यामध्ये सिद्धार्थ आणि अदितीच्या आय़ुष्यात आलेल्या हा व्यक्ती कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मालिकेत याची काय भूमिका असणार याची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र या अभिनेत्याचं नाव शुभम पाटील असं आहे. या नव्या व्यक्तीच्या येण्याने या दोघांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या लग्नात काही अडचण येणार का हे येणाऱ्या भागातच समजेल.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial