मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tujhech Mi Geet Gaat Ahe: मोनिकानं स्वराजचा दिलं गर्दीत सोडून; मल्हार आणेल का शोधून? होईल का बाप लेकीची भेट

Tujhech Mi Geet Gaat Ahe: मोनिकानं स्वराजचा दिलं गर्दीत सोडून; मल्हार आणेल का शोधून? होईल का बाप लेकीची भेट

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत नवं वळण येणार आहे. मल्हारच्या घरी आलेला स्वराज पुन्हा हरवणार आहे.

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत नवं वळण येणार आहे. मल्हारच्या घरी आलेला स्वराज पुन्हा हरवणार आहे.

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत नवं वळण येणार आहे. मल्हारच्या घरी आलेला स्वराज पुन्हा हरवणार आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 02 ऑगस्ट:  स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. स्वराचा स्वराज झाल्यापासून मालिकेनं वेगळं वळण घेतलं आहे. वडिलांच्या शोधात मुंबईत स्वराज म्हणून आलेल्या स्वराजच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. योगायोगानं क्षमा काकी स्वराजला तिचा मुलगा म्हणून घरी घेऊन येते. पिहूला गाण्याच्या स्पर्धेत हरवणाऱ्या स्वराजला घरी आणलेलं पाहून पिहू आणि मोनिका रागवतात. मोनिकानं तर स्वराजला घरात राहू देणार अशी धमकी दिली होती. मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत की की अखेर मोनिका तिची खेळी खेळून स्वराजला मुंबईच्या अनोळख्या ठिकाणी सोडून येते. स्वराज हरवला आहे हे कळताच मल्हार मात्र स्वराजला सोधण्यासाठी बाहेर पडतो. स्वरा मुंबईत स्वराज म्हणून आल्यापासून अनेक संकटांचा सामान करुन अखेर नकळत त्याच्या बाबांच्या म्हणजेच मल्हार कामतच्या घरी आला आहे. मात्र अजूनही बाप लेकाची ओळख झालेली नाही. मात्र दोघांमध्ये ओढ मात्र निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वराज हरवला आहे हे कळताच मल्हार मोठ्या काळजीनं त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो. स्वराजला घरी आणल्याशिवाय मी घरी परत येणार नाही असं मल्हार सांगून स्वराजला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो.
मालिकेचा एक प्रोमो सध्या प्रदर्शित झाला असून ज्यात मोनिका स्वराजला गोड बोलून बाजारात फिरायला नेते. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: अरुंधती देणार संजनाला देशमुखांचा पिढीजात हार; मंगळागौरीसाठी कुटुंब येणार एकत्र स्वराजला मोनिकाला 'मनुका काकू आपण कुठे जातोय', असं अनेक वेळा विचारतो पण मोनिका त्याला 'मी तुला मुंबई दाखवते', असं सांगून नकळत त्याचा हात सोडून गर्दीत एकट्याला सोडून निघून जाते.  इकडे स्वराज हरवला आहे क्षमा काकूला कळताच ती 'मला स्वराज हवा आहे', म्हणत गोंधळ घालते. तेव्हा मल्हार तिला मी स्वराजला शोधायला जातो. त्याला शोधल्याशिवाय मी घरी परतणार नाही असं म्हणतो. आता स्वराजला शोधायला गेलेल्या मल्हारला स्वराज भेटेल का? स्वराज हा मुलगा नसून ती स्वरा आहे आणि ती मल्हार आणि वैदेहीची मुलगी आहे हे मल्हारला कळणार का ? हे सगळे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत हरवलेल्या स्वराजबरोबर काही अघटीत तर घडणार नाही ना? या प्रश्नांची उत्तम मिळवण्यासाठी तुझेच मी गीत गात आहे ही मालिका पाहणे महत्त्वाचं ठरेल.
First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या