S M L

'ट्युबलाईट'ला मिळाली फक्त 19 कोटींची 'ईदी'

ट्युबलाईटला ईदच्या दिवशी बॉक्स आॅफीसवर फक्त 19.09 कोटी कमवता आले. एवढंच नाही तर सुट्टी ,ईद, असा योग जुळून आला असूनसुद्धा या चित्रपटाला 100 कोटींचा आकडा ओलांडता आला नाही.

Sonali Deshpande | Updated On: Jun 27, 2017 04:41 PM IST

'ट्युबलाईट'ला मिळाली फक्त 19 कोटींची 'ईदी'

27 जून  :  सलमान खान प्रमुख भूमिकेत असलेल्या ट्युबलाईटला ईदच्या दिवशी बॉक्स आॅफीसवर फक्त 19.09 कोटी कमवता आले. एवढंच नाही तर सुट्टी ,ईद, असा योग जुळून आला असूनसुद्धा या चित्रपटाला 100 कोटींचा आकडा ओलांडता आला नाही.

ट्युबलाईनं पहिल्या दिवशी 21.15 कोटी कमवले तर दुसऱ्या दिवशी 21.17 कोटी कमवले . तिसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत थोडीशी वाढ झाली आणि 22.45 कोटींपर्यंत मजल मारली.चौथ्या दिवशी ईदची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे ट्युबलाईटची कमाई एकदम वाढेल अशी अपेक्षा होती. पण तसं काहीही न होता ट्युबलाईटची कमाई घसरली.

एकंदर हा सिनेमा प्रेक्षकांना जास्त आवडत नाही असं दिसतयं. ट्युबलाईट हा हॉलिवूडच्या लिटिल बॉय या सिनेमाचा बॉलिवूड वर्जन आहे. लिटिल बॉय बॉक्स आॅफीसवर फ्लॉप झाला होता.


ट्युबलाईटमध्ये सलमानसोबत चिनी अभिनेत्री जुजु आणि बाल कलाकार माटिन रे तंगुनेही काम केलंय.

आतापर्यंत ट्युबलाईटने 83 कोटी 86 लाख रूपये कमवले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 04:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close