S M L

'ट्युबलाइट'ची चिनी अभिनेत्री झू झू प्रमोशनसाठी येणार भारतात

ट्युबलाइट हा 2015 साली आलेला सिनेमा 'लिटिल बॉय'चं भारतीय रुपांतरण आहे, परंतु त्याच्या दिग्दर्शकाचं असं म्हणणंय की, हा सिनेमा भारतीय भावना आणि दृष्टिकोनातून बनवला गेलाय.

Sonali Deshpande | Updated On: May 29, 2017 04:07 PM IST

'ट्युबलाइट'ची चिनी अभिनेत्री झू झू प्रमोशनसाठी येणार भारतात

 29 मे : झू झू ही चिनी अभिनेत्री 'ट्युबलाइट' या आपल्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात येणारेय. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात झू झू ही सलमान खानसोबत महत्त्वाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. कबीर खानने म्हटलंय की, 'माझ्या सिनेमांत नेहमीच अभिनेत्रींची भूमिका महत्त्वाची ठरलीय. या सिनेमातही झू झूने महत्त्वाची भूमिका साकारलीय,परंतु आताच आम्ही  याविषयी जास्त बोलू शकत नाही. ती आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात तर येतेय, परंतु तिचा पूर्ण कार्यक्रम अजून तयार झाला नाहीये.'

पीके आणि दंगल यांसारख्या भारतीय सिनेमांनी चीनमध्ये चांगली कमाई केलीय. त्यामुळेच ट्युबलाइटचे निर्मातेही हा सिनेमा चीनमध्ये रिलीज करण्यासाठी उत्सुक आहेत. कबीर खाननं म्हटलंय की, 'जेव्हा भारतीय सिनेमे चीनमध्ये रिलीज करण्याची वेळ येते, तेव्हा तेथील मार्केट अचानक बदलून जातं. अगोदर त्यांना सिनेमा दाखवावा लागतो आणि  त्यानंतर तो चित्रपट त्यांना आवडला तरच तो सिनेमा पास केला जातो.'

ट्युबलाइट हा 2015 साली आलेला सिनेमा 'लिटिल बॉय'चं भारतीय रुपांतरण आहे, परंतु त्याच्या दिग्दर्शकाचं असं म्हणणंय की, हा सिनेमा भारतीय भावना आणि दृष्टिकोनातून बनवला गेलाय.ट्युबलाइटमध्ये सलमानसोबतच सोहेल खान आणि ओम पुरीही पहायला मिळणारेत. तर शाहरूख खानही यामध्ये पाहुणा कलाकार असेल. हा सिनेमा ईदला रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 04:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close