मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /तू तेव्हा तशी मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा कायमचाच निरोप; अभिनेत्री झाली भावुक

तू तेव्हा तशी मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा कायमचाच निरोप; अभिनेत्री झाली भावुक

shilpa tulaskar

shilpa tulaskar

मालिकेत स्वप्निल जोशी, शिल्पा तुळसकर, सुहास जोशी, अभिज्ञा भावे, रूमानी खरे, स्वानंद केतकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26, मार्च : झी मराठी वाहिनीवर मागील काही महिने सातत्यानं नव नवीन प्रयोग सुरू आहेत. अनेक नव्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात.अनेक नव्या कथा या निमित्तानं प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. त्यातील काही मालिकांना प्रेक्षकांना पसंती दिली. यातील एक मालिका म्हणजे तू तेव्हा तशी. मालिकेतून अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर परतले. तू तेव्हा तशी ही मालिका काही महिन्यांआधीच प्रेक्षकांचा निरोप घेते असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अफवांवर मात करत पुढील काही महिने मालिका अविरतपणे सुरू होती. पण आता मात्र खरंच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.

मालिकेत पट्या आणि अनुची अनोखी लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला आली. पहिल्या लग्नातून विभक्त झालेली एका मोठ्या मुलीची आई. सक्षम, खमकी आणि स्वत:च्या पायावर उभी असलेली मिस अनामिका आणि आपल्या प्रेमाचा वाट पाहणारा, कुटुंबावर नितांत प्रेम आणि त्यांच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असलेला पट्या मालिकेत पाहायला मिळाले. पण आता लवकरच पट्या आणि अनामिका प्रेक्षकांचा कायमचाच निरोप घेणार आहेत.

हेही वाचा - aai kuthe kay karte : आईचं लग्न होताच लेकाचं ब्रेकअप; यश-गौरीचं लग्न कसं वाचवू शकेल अरुंधती?

अनामिका म्हणजेच अभिनेत्री शिल्पा तुळसकरनं मालिकेच्या शेटवच्या शुटींगचा फोटो शेअर करत वल्ली आणि राधासाठी म्हणजे अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि रूमानी खरे यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. मालिकेत राधा आणि नीलचं लग्न होणार आहे. लग्नातील राधा आणि वल्लीचा फोटो शेअर करत शिल्पा तुळसकरनं लिहिलंय, "मी या दोघींपासून कशी दूर राहू?"  तिघींच्या गोड फोटोला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

मालिका आधी रात्री 8 वाजता प्राइम टाइला टेलिकास्ट होत होती. पण मालिकेची वेळ बदलण्यात आली. मालिकेत स्वप्निल जोशी, शिल्पा तुळसकर, सुहास जोशी, अभिज्ञा भावे, रूमानी खरे, स्वानंद केतकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. मालिकेतील पट्या आणि अनुचा रोमँटिक सीन चांगलाच गाजला होता. या सीनमुळे मालिकेला चांगलंच ट्रोल देखील करण्यात आलं होतं.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial