उज्वला जोग या प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग (anant jog) यांच्या पत्नी आहेत. अनंत जोग यांनी मराठी तसेच हिंदी सृष्टीत खलनायकी ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. अनंत जोग हे अभिनेत्री शांताबाई जोग यांचे चिरंजीव होय. अभिनयाचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाला असे म्हणायला हरकत नाही. त्यांची मुलगी क्षिती जोग ही देखील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मराठी अभिनेता हेमंत ढोमे याच्याशी क्षिती विवाहबद्ध झाली.View this post on Instagram
उज्वला जोग यांनी मालिका चित्रपटांमधून गंभीर तसेच विनोदी अशा विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. कुंकू लावते माहेरचं, नवरा बायको, सौभाग्य कांकन, कन्यादान, जाऊ तिथे खाऊ. हम बने तुम बने, झिम्मा, मित्राची गोष्ट अशा चित्रपट, मालिका तसेच नाटकांमधून सोज्वळ तर कधी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. सूर्याची पिल्ले, ढोल ताशे, लुका छुपी हि, शांतेचं कार्ट चालू आहे त्यांनी अभिनित केलेली गाजलेली नाटकं आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial