Home /News /entertainment /

VIDEO: अभिनेता स्वप्निल जोशीचा लेक शिकला नवा शब्द; ऐकून तुमच्याही भुवया उंचावतील

VIDEO: अभिनेता स्वप्निल जोशीचा लेक शिकला नवा शब्द; ऐकून तुमच्याही भुवया उंचावतील

VIDEO: अभिनेता स्वप्निल जोशीचा लेक शिकला नवा शब्द; ऐकून तुमच्याही भुवया उंचावतील

VIDEO: अभिनेता स्वप्निल जोशीचा लेक शिकला नवा शब्द; ऐकून तुमच्याही भुवया उंचावतील

अभिनेता स्वप्निल जोशीची (Swapnil Joshi) मुलं सोशल मीडियावर नेहमीच धुडगूस घातल असतात. त्याच्या मुलानं राघवनं (Raghav Joshi) एक नवा शब्द शिकला आहे तो ऐकून तुम्हीही त्याचं कौतुक कराल.

  मुंबई, 10 जून: अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi)  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तु तेव्हा तशी ( Tu Tevha Tashi)  या  त्याच्या नव्या मालिकेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो तो सतत शेअर करत असतो. त्याचप्रमाणे त्याच्या घरातील व्हिडीओही स्वप्निल शेअर करत असतो. स्वप्निल आणि त्याच्या मुलांची धम्माल त्याच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. स्वप्निलला मायरा (Mayra Joshi) आणि राघव (Raghav Joshi)  अशी दोन मुलं आहेत. व्हिडीओमध्ये स्वप्निल कधी मुलांशी मस्ती करताना तर कधी त्यांना नवीन गोष्टी शिकवताना दिसतो. यावेळी स्वप्निलनं मुलगा राघवचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केलाय. छोटासा राघव एक नवीन शब्द बोलायला शिकलाय. त्याचा तो शब्द ऐकून तुमच्याही भुवया उंचावतील. स्वप्निलचा मुलगा राघव नुकताच 'आश्चर्यचकीत' हा शब्द बोलायला शिकला आहे. बोबड्या बोलातही राघव अगदी स्पष्टपणे आश्चर्यचकीत हा शब्द बोलतो. त्यानं शिकलेल्या या नवीन शब्दाचं स्वप्निलला भारी कौतुक आहे. त्यानं राघवला तो शब्द बोलायला लावून त्याचा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. स्वप्निलनं शेअर केलेल्या व्हिडीओत स्वप्निल म्हणतो, 'आज आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी एक नवीन शब्द शिकलोय. राघव जेव्हा तू दुकानात नवीन बूट बघितले होतेस तेव्हा तू काय झाला होतास?', असं स्वप्निल राघवला विचारतो. त्यावर राघव म्हणतो 'आश्चर्यचकीत' . त्याच्या बोबड्या बोलातून आलेला आश्चर्यचकीत हा स्पष्ट शब्द ऐकून स्वप्निल त्याला पुन्हा पुन्हा विचारतो, काय झाला होता? त्यावर राघव पुन्हा 'आश्चर्यचकीत' हा शब्द म्हणून दाखवतो.
  लेकानं शिकलेला हा नवीन शब्द ऐकून स्वप्निल भलताच खुश झालाय. व्हिडीओच्या शेवटी तो खळखळून हसताना देखील दिसतोय. हेही वाचा - परीनं घेतला पहिल्या पावसाचा आनंद; रेन डान्सचा झक्कास VIDEO व्हायरल राघवचा हा नवीन शब्द ऐकून स्वप्निलच्या चाहत्यांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केलाय. एका युझरनं 'अरे राघव तर छोटा स्वप्निल आहे', असं म्हटलंय. तर दुसऱ्या एका युझरनं म्हटलंय, 'हे ऐकून आता आम्हीही आश्चर्यचकित झालोय'. स्वप्निल जोशी त्याच्या मुलांवर करत असलेले संस्कार वेळोवेळी आपण पाहिले आहेत. स्वप्निल आणि त्याची पत्नी लीना दोघेही मुलांना नेहमी नवीन गोष्टी शिकवत असतात. झाडे लावण्यापासून संस्कृती परंपरा जपण्यापासून सगळ्या गोष्टी दोघेही मुलांना शिकवत असतात. स्वप्निलची दोन्ही मुलं आजी आजोबांच्या छायेखाली मोठी होत आहेत. मुलांचे अनेक व्हिडीओ स्वप्निलनं अनेकदा शेअर केले आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या