मुंबई, 30 नोव्हेंबर : मराठी चित्रपटसृष्टीला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. सध्या एकामागोमाग एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘शिवप्रताप गरुडझेप’, ‘हर हर महादेव’ या चित्रपटानंतर आता अजून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘राऐतिहासिक चित्रपटांची तर रीघच लागली आहे. आता अजून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटाचे नाव आहे ‘रावरंभा’. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटामध्ये झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी मालिकेतील अभिनेता ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे.
‘रावरंभा’ हा प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असणारा बहुचर्चित, भव्यदिव्य चित्रपट ७ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण संपून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ची कथा काय आहे?,कोण कोण कलाकार आहेत? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तरी हा चित्रपट स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या चरित्रावर आधारित आहे. त्यांची एक लक्षवेधी झलक समोर आली आहे.
गत या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आपली छाप उमटवणारे अभिनेते अशोक समर्थ दिसत आहेत. पोस्टरवर सरसेनापतींच्या गौरवार्थ "निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते, गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते" अशी जोशपूर्ण ओळ लिहिली आहे. यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर हे चारही बाजूंनी शत्रूने घेरलेलं असताना युद्ध करताना दिसतायेत. शत्रूवर तुटून पडताना दिसत आहेत.
View this post on Instagram
अभिनेते अशोक समर्थ नुकतेच झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी मालिकेत झळकले होते. त्यांची या मालिकेत त्यांनी अनामिकाच्या नवऱ्याची आकाश जोशींची भूमिका साकारली होती. हि त्यांची खलनायकी भूमिका होती. त्यांना याआधी प्रेक्षकांनी पोलिसांच्या भूमिकेत पाहिलेलं आहे. आता ऐतिहासिक भूमिका अशोक समर्थ पहिल्यांदाच साकारणार असून त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
या पोस्टरवरून ‘रावरंभा’चे नेमके कथानक काय आहे ? याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच यातील प्रत्येक पात्र रसिकांसमोर येणार असून ‘रावरंभा’ ही भव्यदिव्य ऐतिहासिक कलाकृती पहाण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial