मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tu chal pudha : नवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररुपी रावण जाळू शकेल का अश्विनी?; एपिसोड अपडेट पाहा

Tu chal pudha : नवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररुपी रावण जाळू शकेल का अश्विनी?; एपिसोड अपडेट पाहा

तू चाल पुढं

तू चाल पुढं

'तू चाल पुढं' मालिकेत दसरा साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत दसऱ्यादिवशी अश्विनी रावण दहन करणार आहे. पण याच मुहूर्तावर ती श्रेयसला त्याची चूक दाखवून देणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

 मुंबई, 1 ऑक्टोबर : सर्वसामान्य गृहिणीची कथा असलेल्या 'तू चाल पुढं' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात बाजी मारली आहे. या मालिकेतील अश्विनीला महिला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे.  आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं मनवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. अश्विनी पतीला पाठींबा देते पण वेळ आली तर त्याच्या चुकाही दाखवून देते. पण यामुळे तिने विशेष करून महिला प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यात अश्विनी येणाऱ्या भागात श्रेयसविषयी काय भूमिका घेणार ते दाखवलं आहे.

'तू चाल पुढं' मालिकेत नवरात्र आणि दसरा साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत दसऱ्यादिवशी अश्विनी रावण दहन करणार आहे. पण याच मुहूर्तावर ती श्रेयसला त्याची चूक दाखवून देणार आहे. सध्या श्रेयस अश्विनीला फार चांगली वागणूक देत नाही. तो अश्विनीला कमी लेखतो ते तीला समजलं आहे. त्यामुळे येत्या दसऱ्याला ती श्रेयसला चांगलंच  सुनावणार आहे.  प्रोमोनुसार, अश्विनी दसऱ्याच्या मुहूर्तावर रावण दहन करताना म्हणते कि, ''एका  आगीच्या बाणाने हा लाकडी रावण जळून खाक होऊ शकतो पण आपल्या आत जो रावण दडलाय त्याचं काय?''

हेही वाचा - Subodh Bhave : छत्रपतींच्या भूमिकेसाठी मिळालेल्या मानधनाचा सुबोधने केला असा उपयोग; वाचून वाटेल अभिमान

पुढे ती म्हणते, ''अहंकारामुळे मरत असलेली नाती जपायची आणि जगवायची. मग ते नातं आई बाबांचं असो किंवा नवरा बायकोचं.'' एवढं बोलून ती श्रेयसकडे पाहते. अश्विनीचा हा दृष्टिकोन  श्रेयसला कधी समजेल  माहित नाही पण प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. अल्पावधीतच हा प्रोमो हिट झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी विशेषतः महिला प्रेक्षकांनी या पोस्टवर कमेंट करत अश्विनीला पाठींबा दर्शवला आहे. आतापर्यंत नवऱ्याच्या कुठल्याही गोष्टीला पाठींबा देणारी अश्विनीने श्रेयसला त्याची चूक दाखवून दिली आहे. हा भाग मालिकेत येत्या ५ ऑक्टोबरला  पाहायला मिळणार आहे.

याआधी अश्विनीचा  ''मिस आणि मिसेस मध्ये फरक फक्त 'आर' चा आहे. तो आर म्हणजे रिस्पेक्ट. नवरा बायकोच्या नात्यात फक्त प्रेम नाही आदर हवा.'' हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला होता. विशेषतः महिला प्रेक्षकांना तो खूप भावला होता. त्यांनी या पोस्टवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत अश्विनीचं  कौतुक केलं होतं. त्याप्रमाणे अश्विनीचा हा दृष्टिकोन प्रेक्षकांना किती आवडतोय ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.

अश्विनी आणि श्रेयस यांना कुटुंबासाठी नवं घर घ्यायचं आहे. राहणीमान उंचवायचं आहे. श्रेयस अनेकांना घरासाठी कर्ज मिळवून देणाऱ्या कंपनीत नोकरी करायचा पण तेच काम स्वतंत्रपणे करण्याचं ठरवून त्याने बिझनेस सुरू केला आहे. अश्विनीनेच त्याच्या ऑफिससाठी एक जागाही शोधून काढली. अश्विनी श्रेयसकडे तिलाच असिस्टंट म्हणून ठेवण्याची मागणी करते. मात्र श्रेयस तिचा अपमान करतो. आता ती याला त्याच्या चुकीची जाणीव आगामी भागांमध्ये करून देणार आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial