मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Tu Chal Pudha : मालिका बघून मिळाला कॉन्फिडन्स; मग तिनंही सुरू केलं 'अश्विनी ब्युटी पार्लर'

Tu Chal Pudha : मालिका बघून मिळाला कॉन्फिडन्स; मग तिनंही सुरू केलं 'अश्विनी ब्युटी पार्लर'

tu chal pudha

tu chal pudha

अभिनेत्री दीपा परबची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मालिकेतील अश्विनी इतकी प्रसिद्ध झाली आहे ती अनेकांसाठी आदर्श बनली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी : टेलिव्हिजनवरील मालिका या आपल्यातील प्रत्येकाच्या जिवनाचा एक अविभाज्य भाग झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाच्या घरात एक तरी व्यक्ती अशी असेल जिला मालिका पाहायला आवडतात. दिवसातून एकदा तरी एक तरी मालिका प्रत्येकाच्या घरी लागतच असेल. मालिकेतून दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या, काही पटणाऱ्या आणि हल्ली न पटणाऱ्या गोष्टी दाखवल्या जातात. अनेक मालिकांमधून स्त्रीयांकडे फोकस केल्याचं पाहायला मिळतं. त्यातील सध्या सुरू असलेली एक मालिका म्हणजे झी मराठीवरील 'तू चाल पुढं'. अभिनेत्री दीपा परबची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मालिकेतील अश्विनी इतकी प्रसिद्ध झाली आहे ती अनेकांसाठी आदर्श बनली आहे. मालिका बघून एका महिलेला कॉन्फिडन्स मिळाला आणि तिनं जे काही केलं त्याचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठी मालिकांमधील घरात संसार करणार सोशिक, सालस सूनेपर्यंत ते घर संसार सांभाळून नोकरी करणाऱ्या स्त्रीपर्यंत तसंच नव्या पिढीतील सूनांपर्यंत सगळेच विषय हाताळल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आपल्या स्वप्नांचा ठाव घेणाऱ्या अश्विनी वाघमारेची गोष्ट तू चाल पुढं या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. पार्लरची आवड असूनही केवळ घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तिला ते करत येत नसतं मात्र परिस्थितीमुळे ती स्वत:चं पार्लर सुरू करण्याचा निर्णय घेते आणि त्यात कशी यशस्वी होते हे मालिकेचं मुळ कथानक आहे.

हेही वाचा - ऐश्वर्या नारकर फिट राहण्यासाठी नेमका कोणता व्यायाम करतात? फिटनेस मंत्रा आला समोर

तू चाल पुढं मधील अश्विनीचा आदर्शन डोळ्यांसमोर ठेवून अश्विनी सारख्याच एका महिलेनं देखील स्वत:चं पार्लर सुरू केलं आहे. त्या पार्लरचं नाव देखील तिनं 'अश्विनी ब्युटी पार्लर' असंच ठेवलं आहे. तिनं पोस्ट लिहीत ही माहिती दिली आहे.  झी मराठीनं पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

तू चाल पुढं मालिकेतून प्रेरणा घेऊन स्वत:चं पार्लस सुरू करणाऱ्या महिलेचं नाव देखील अश्विनीच आहे. त्यांनी लिहिलंय, 'मी सांगू इच्छिते की ही मालिका चालू झाली तेव्हा मी पार्लरचा क्लास करत होते. विशेष ही माझं नाव ही अश्विनी असल्यामुळे आणि तू चाल पुढं अश्विनी ब्युटी पार्लर या मालिकेत असल्यामुळे मला ही मालिका खूप आवडायची. या मालिकेतून मी अश्विनीकडून खूप काही घेतलं. माझी ही लाईफ काही प्रमाणात बऱ्याचशा प्रमाणात अशीच. कधीतरी मी ही मालिका पाहता पहाता रडायचे. स्वत:ला इमेजिन करायचे. पण नाही आता काहीतरी करायचं हे मनाशी ठरवून तू चाल पुढं असा निर्णय घेतला'.

त्यानी पुढे लिहिलंय, 'मला ही मालिका बघून अश्विनीकडून इतका कॉन्फिडन्स मिळाला की मी सहा महिन्यात पूर्ण पार्ल शिकून स्वत:च्या पायावर उभे राहिले. शून्यातून विश्व निर्णाण केलं. आज माझं स्वत:चा मला खूप अभिमान आहे की योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून खूप काही शिकले. आज माझंही अश्विनी ब्युटी पार्लर आहे. याचे सर्व श्रेय मी दीपा मॅडम ( माझ्या अश्विनी मॅडम) सर्व झी मराठीची टीम यांना थँक्यू. मनापासून थँक्यू धन्यवाद'.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial