मुंबई, 14 जुलै- मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सध्या सोशल मीडियावर खुपचं चर्चेत आहे. हेमांगीने केलेल्या ‘बाई, बुब्स...आणि ब्रा’ या पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. तिच्या या पोस्टवरून अनेक क्षेत्रातून विविध प्रतक्रिया येत आहेत. नुकताच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी त्याना तिखट शब्दात प्रश्न केला आहे, त्यांनी म्हटलं आहे, ‘शिर्डीच्या ड्रेसकोडसाठी आम्ही रान पेटवल तेव्हा या कुठे होत्या? पुढे त्यांनी म्हटलं आहे, इंदोरीकर महाराज जेव्हा महिलांविरुध्द बदनामीकारक वक्तव्य करत होते, तेव्हा या कुठे होत्या? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
अभिनेत्री हेमांगी कवीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केला होता. त्यामध्ये ती पोळी लाटताना दिसत होती. मात्र या व्हिडीओवर तिला अनेक लाजिरवाण्या कमेंट्स आल्या होत्या. अनेक युजर्सनी आणि खास करून महिला युजर्सनी तिला कमेंट्स करत तुझे बुब्स हालताना दिसत आहेत, किंवा तू हे पैसे मिळवण्यासाठी करत आहेस का? जरा डीसेंट वाग, व्यवस्थित कपडे घाल असं म्हटलं होतं. या कमेंट्स पाहून हेमांगीला खूपच दुख झालं होतं. आणि म्हणूनच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘बाई, बुब्स..ब्रा’ नावाची पोस्ट शेयर करत स्त्री आणि त्यांच्या स्वतंत्र विचारांवर भाष्य केलं होतं. या पोस्टला अनेक अभिनेत्रिनी तर पाठींबा दिलाचं होता शिवाय प्रविण तरडेसारख्या अभिनेत्यांनीही पाठींबा दर्शवला होता.
(हे वाचा:VIDEO: 'बहुत खूबसुरत हो'; श्रुती मराठेचा साडी LOOK पाहून चाहते पडले प्रेमात )
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी याच पोस्टच्या पार्शभूमीवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी हेमांगीला तिखट शब्दात ‘शिर्डीच्या ड्रेसकोडसाठी आम्ही रान पेटवल तेव्हा या कुठे होत्या? पुढे त्यांनी म्हटलं आहे, इंदोरीकर महाराज जेव्हा महिलांविरुध्द बदनामीकारक वक्तव्य करत होते, तेव्हा या कुठे होत्या? असे प्रश्न केले आहेत.
(हे वाचा:प्राजक्ता माळी सांगणार आपलं गुपित; लवकरच घेऊन येतेय काहीतरी खास )
तसेच तृप्ती यांनी म्हटलं आहे, ‘आम्हीसुद्धा स्त्रियांच्या याच स्वातंत्र्यासाठी झगडतो, लढतो मात्र तेव्हा हे लोक का आम्हाला पाठींबा देत नाहीत. किंवा प्रविण तरडेसारखा अभिनेता का आम्हला पाठींबा दर्शवत नाही’. असंही त्यांनी म्हटलं आहे. हेमांगीच्या या पोस्टवरून समाजातील विविध माध्यमातून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment