#TRPमीटर : आदेश भाऊजींचं 'झिंगाट' झालं लोकप्रिय, 'हवा'चं भवितव्य धोक्यात

गेल्या आठवड्यात आदेश बांदेकरांचा नवा अंताक्षरी शो पहिल्या पाचात आलाय. शनाया मात्र टाॅपवरच राहिलीय.

  • Share this:

पाचव्या स्थानावर आहे नवा शो झिंग झिंग झिंगाट. अंताक्षरीसारखा हा शो सर्वसामान्यांना नवा प्लॅटफाॅर्म देतोय. शोचे सूत्रसंचालक आहेत सर्वांचे लाडके आदेश भाऊजी.त्यामुळेही शो सुरू झाल्या झाल्याच पहिल्या पाचात आला. काही दिवसांपूर्वी इतर कलाकारांनी आपापल्या फेसबुकवर अंताक्षरी करून या शोचं प्रमोशनही दणक्यात केलं होतं. आतापर्यंत चला हवा येऊ द्या पाचमध्ये असायचा. पण या वेळी ते स्थान झिंगाटनं मिळवलं.

पाचव्या स्थानावर आहे नवा शो झिंग झिंग झिंगाट. अंताक्षरीसारखा हा शो सर्वसामान्यांना नवा प्लॅटफाॅर्म देतोय. शोचे सूत्रसंचालक आहेत सर्वांचे लाडके आदेश भाऊजी.त्यामुळेही शो सुरू झाल्या झाल्याच पहिल्या पाचात आला. काही दिवसांपूर्वी इतर कलाकारांनी आपापल्या फेसबुकवर अंताक्षरी करून या शोचं प्रमोशनही दणक्यात केलं होतं.आतापर्यंत चला हवा येऊ द्या पाचमध्ये असायचा. पण या वेळी ते स्थान झिंगाटनं मिळवलं.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेनं आपलं चौथं स्थान कायम ठेवलंय. सध्या या मालिकेत खूपच घडामोडी घडतायत. मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर रायगडवर सुरू असलेलं राजकारण, शंभू महाराजांवर होणारा अन्याय यामुळे मालिकेला गती आली. त्यामुळे प्रेक्षक खिळून राहिले.

हा टीआरपी रेटिंगचा चार्ट पुन्हा तेच चित्र दर्शवतोय. त्यात इतर वाहिन्यांवरच्या मालिका पोचल्याच नाहीत.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनं आपलं स्थान अबाधित ठेवलंय. त्यासाठी रविवारचा महाएपिसोडही कारणीभूत ठरलाय. कुस्तीमागचं राजकारण आणि त्याला चोख उत्तर देणारी अंजली अशा बऱ्याच घटना या मालिकेत घडतायत. त्यामुळे प्रेक्षकांचाही मालिकेत जीव रंगला.

मालिकांमध्ये खरी स्पर्धा तुला पाहते रे आणि माझ्या नवऱ्याची बायको या दोन मालिकांत आहे. 'तुला पाहते रे'मध्ये विक्रांत सरंजामेनं ईशाला जरी प्रपोझ केलं नसलं तरी दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं सगळ्यांना कळलंय. विक्रांत त्याच्या अॅक्शनमधून ते सांगतोही. येत्या रविवारी या मालिकेचा महाएपिसोडही आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये बऱ्याच गोष्टी घडतायत. राधिका आता शनाया आणि तिच्या आईला तोंड द्यायला सज्ज झालीय. ती शनायाच्या आईचे सगळे डाव अयशस्वी करण्यासाठी राधिकानं कंबर कसलीय. मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत. प्रेक्षकांना जे आवडेल तेच ही मालिका देतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 03:01 PM IST

ताज्या बातम्या