#TRPमीटर : लग्नाच्या धामधुमीलाच प्रेक्षकांची पसंती; शनाया आणि ईशामध्ये चढाओढ

TRPमीटरमध्ये या वेळी लग्नांचे विषयच लोकांना आवडतात असं वाटतंय. ईशा-विक्रांतच्या लग्नाची धामधूम आणि गुरू-शनायाच्या लग्नाची चर्चा प्रेक्षकांना आवडलीय.

  • Share this:

टीआरपी रेटिंगची गणितं दर आठवड्याला बदलत राहतात. यावेळी पाचव्या स्थानावर आहे चला हवा येऊ द्या. गेल्या वेळी हा शो तिसऱ्या नंबरवर गेला होता. पण यावेळी पुन्हा एकदा हवा पाचव्या स्थानावर आलीय. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शोमध्ये सिनेमाचीच प्रमोशन्स होती. अनेकदा विनोदातही साचलेपण येतं, त्यामुळेही हा शो पाचव्या स्थानावर आलाय.

गेल्या वेळी 'स्वराज्यरक्षक संभाजी' दुसऱ्या स्थानावर होतं. यावेळी ही मालिका चौथ्या नंबरवर आलीय. खरं तर या मालिकेत इतिहासाचं एकेक पान उलगडत जातं. ही मालिका पाहताना प्रेक्षक इतिहासात जातात. अर्थात, इतर मालिकांची घोडदौडही जोरदार आहे. झी मराठीच्या मालिकांना एकमेकांतच स्पर्धा करावी लागते.

टीआरपी रेटिंगचा चार्ट पाहिला की पुन्हा एकदा हेच लक्षात येतं की इतर वाहिन्यांवरच्या मालिकांना पहिल्या पाचमध्ये स्थानच नाही. झी मराठीच्या मालिकांच्या एकमेकांत स्पर्धा आहेत.

पुन्हा एकदा 'तुझ्यात जीव रंगला' तिसऱ्या नंबरवर आलीय. या मालिकेत सध्या बऱ्याच घडामोडी घडतायत. महत्त्वाचं म्हणजे पाठकबाई निवडणुकीला उभ्या राहतात, त्याभोवतीच सर्व गोष्टी सुरू आहेत.त्याचा फायदा मालिकेला झाला.

गेल्या वेळी पाचव्या स्थानावर असलेली 'तुला पाहते रे' पुन्हा एकदा नंबर दोनवर आली. गेली अनेक आठवडे ईशा आणि विक्रांतच्या लग्नाची धामधूम मालिकेत पाहायला मिळतेय. सर्व काही राजेशाही पद्धतीनं होतंय. डोळ्याला सुखावणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना आवडतायत.

कुठल्या मालिकेचं काहीही होवो, माझ्या नवऱ्याची बायको पहिलं स्थान सोडायला तयार नाही. आता तर मालिकेत गुरू शनायाशी लग्न करायला निघालाय. त्यात अजून एक प्रेमाचा ट्रॅक सुरू आहे. तो म्हणजे जेनीचा. ख्रिश्चन आणि गुजराती लग्नाचा बारही लवकर उडणार. राधिका, शनाया, शनायाची आई यांच्यातल्या चढाओढी प्रेक्षकांना पाहायला आवडतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 03:20 PM IST

ताज्या बातम्या