Home /News /entertainment /

Vicky kaushal वरचं मोठं संकट टळलं, दाखल झालेल्या तक्रारीबाबत मोठा खुलासा

Vicky kaushal वरचं मोठं संकट टळलं, दाखल झालेल्या तक्रारीबाबत मोठा खुलासा

गेल्या दोन दिवसांपासून 'लुका छुपी 2' (Luka Chuppi 2) चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. शूटिंगदरम्यान विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांनी वापरलेल्या बाईकचा नंबर बनावट असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 3 जानेवारी: गेल्या दोन दिवसांपासून 'लुका छुपी 2' (Luka Chuppi 2) चित्रपटाच्याच्या शूटिंगमध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांनी वापरलेल्या बाईकचा नंबर बनावट असल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर विकीविरोधात पोलिसांकडे तक्रारदेखील दाखल करण्यात आली. विकी कौशलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाचा प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. विकी कौशलने वापरलेल्या दुचाकीचा क्रमांक तक्रारदाराच्या वाहनाच्या नंबर प्लेटशी जुळत नाही. एचटीने दिलेल्या वृत्तानुसार इंदूर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, इंदूर पोलिसांचे म्हणणे आहे की, बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इंदूरच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसले. ती बाईक प्रॉडक्शन हाऊसची होती. हा गैरसमज बोल्टमुळे झाला होता. त्या बोल्टमुळे बाईकचा नंबर 1 ऐवजी 4 दिसत होता. गैरसमजुतीतून झाली होती तक्रार दाखल जयसिंग यादव यांच्या तक्रारीनंतर तपासासाठी पोलिस थेट चित्रपटाच्या सेटवर पोहोचले आणि तेथे पोहोचल्यानंतर त्यांना वेगळ्या दुचाकीचा क्रमांक मिळाला. वृत्तानुसार, या प्रकरणावर बोलताना उपनिरीक्षक राजेंद्र सोनी म्हणाले की, नंबर प्लेटच्या तपासादरम्यान आम्हाला कळले की नंबर प्लेटवरील बोल्टमुळे सर्व गैरसमज निर्माण झाले आहेत. त्या बोल्टमुळे नंबर एक नंबर चार सारखा दिसतो आणि वापरलेली नंबर प्लेट ही प्रॉडक्शन हाऊसचीच आहे, त्यामुळे आमच्या तपासामध्ये आम्हाला काहीही बेकायदेशीर आढळले नाही. नेमकं काय आहे प्रकरण? आगामी 'लुका छुप्पी 2' चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशात सुरू आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये सुरु आहे. या चित्रपटातील एक दृश्य चित्रित करण्यात आले आहे. त्या सीनमध्ये विकी कौशल सारा अली खानला बाईक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यानंतर चित्रीकरणाचा व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. वृत्तपत्रामध्ये फोटो छापल्यानंतर, इंदौरच्या बाणगंगा भागातील सुंदर नगरमधील रहिवासी जयसिंग यादव यांनी दावा केला की, जी दुचाकी विक्की कौशलने चालवली होती, ज्याचा क्रमांक MP-09 UL 4872 आहे. त्यानंबरची स्कुटी त्यांनी 25 मे 2018 रोजी एरोड्रोम येथील शोरूममधून विकत घेतली. जे वाहन वापरले जात आहे ते बनावट आहे. चित्रीकरणात वापरलेला दुचाकीचा नंबर त्यांच्या स्कुटीचा आहे. दरम्यान याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Sara ali khan, Vicky kaushal

    पुढील बातम्या